Lokmat Sakhi >Health > तूप आरोग्यासाठी फायदेशीरच पण हे ५ त्रास असतील तर तूप खाताना जपून, कारण..

तूप आरोग्यासाठी फायदेशीरच पण हे ५ त्रास असतील तर तूप खाताना जपून, कारण..

Avoid Ghee if you have this 5 Health Issues : तूप सगळ्यांसाठीच चांगले असते असे नाही. तर आरोग्याच्या काही विशिष्ट तक्रारी असणाऱ्यांसाठी तूप घातक असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 10:50 IST2022-07-16T10:45:45+5:302022-07-16T10:50:02+5:30

Avoid Ghee if you have this 5 Health Issues : तूप सगळ्यांसाठीच चांगले असते असे नाही. तर आरोग्याच्या काही विशिष्ट तक्रारी असणाऱ्यांसाठी तूप घातक असते

Avoid Ghee if you have this 5 Health Issues : Ghee is beneficial for health but if you have these 5 problems, be careful while eating ghee, because.. | तूप आरोग्यासाठी फायदेशीरच पण हे ५ त्रास असतील तर तूप खाताना जपून, कारण..

तूप आरोग्यासाठी फायदेशीरच पण हे ५ त्रास असतील तर तूप खाताना जपून, कारण..

Highlightsगर्भवती महिलांनीही सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये आणि वजन जास्त प्रमाणात वाढत असल्यास तूप टाळावे. तूपात आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्म असले तरी काही आजार असणाऱ्यांनी आवर्जून तूप टाळायला हवे...

गरम भातावर, पोळीवर किंवा एखादा गोड पदार्थ करण्यासाठी आपण आवर्जून तूप वापरतो. अनेकांना तर तूप इतकं आवडतं की ते कोणताही पदार्थ तूप घालून घाऊ शकातत. तूप आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने दिवसातून १ ते २ चमचे तूप आहारात अवश्य असायला हवे असे आहारतज्ज्ञ अनेकदा सांगतात. पचनशक्ती, त्वचा, केस तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी तूप अतिशय फायदेशीर असते. तसेच हाडांमधील वंगण म्हणूनही तूपाचा फायदा होतो (Healthy Diet Tips). असे असले तरी तूप सगळ्यांसाठीच चांगले असते असे नाही. तर आरोग्याच्या काही विशिष्ट तक्रारी असणाऱ्यांसाठी तूप घातक असते असे प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रेखा राधामणी (Rekha Radhamani) यांनी सांगितले आहे. आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्या आपल्या फॉलोअर्सना यासंबंधी माहिती देतात (Avoid Ghee if you have this 5 Health Issues ). 

(Image : Google)
(Image : Google)

प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे प्रकृतीनुसार प्रत्येकासाठी योग्य असलेला आहारही वेगळा असू शकतो. काहींसाठी तूप हे औषध असू शकते तर काहींसाठी हेच तूप विषासमान ठरु शकते असे डॉ. रेखा यांचे म्हणणे आहे. तूप प्रकृतीने उष्ण असल्याने साधारणपणे थंडीच्या दिवसांत तूप खाण्याचा सल्ला घरातील वयस्कर मंडळीही आपल्याला अनेकदा देताना दिसतात. थंडीच्या दिवसांत शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी तूपाचा वापर करायला हवा. हे जरी खरे असले तरी आरोग्याच्या काही व्याधी असणाऱ्यांसाठी तूप खाणे हानिकारक आहे. त्यामुळे आपली पचनशक्ती आणि प्रकृती लक्षात घेऊन आपण आहारात तूपाचा समावेश करायला हवा असा सल्लाही त्या देतात. 

१. अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी टाळावे 

ज्यांना अपचनाचा त्रास आहे अशांनी शक्यतो तूप खाणे टाळायला हवे. ज्यांना पित्ताशय, अल्सर, पोटाशी निगडीत इतर तक्रारी आहेत त्यांनी आहारात तूपाचा वापर करु नये. कारण तुपामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे या व्यक्तींचे पोटाशी निगडीत त्रास वाढण्याची शक्यता असते. 

२. लिव्हर सिरोसीस 

लिव्हर सिरोसीस हा हळूहळू वाढणारा यकृताशी निगडीत असणारा आजार आहे. या आजारामध्ये यकृताची क्षमता आधीच खराब झालेली असते. तुपाच्या सेवनाने त्यामध्ये आणखी अडथळे निर्माण होतात आणि यकृत जास्त प्रमाणात खराब होण्याची शक्यता असते. 

३. व्हायरल इन्फेक्शन 

अनेकदा हवाबदल झाला किंवा हवेत गारठा पडला की आपल्याला ताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या निर्माण होतात. आयुर्वेदानुसार कफ झालेल्या व्यक्तींनी तूप खाल्ल्यास त्यांचा कफ आणि खोकला किंवा सर्दीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ताप किंवा कफ असेपर्यंत शक्यतो तूप टाळलेले बरे. 


 

४. हिपेटायटीस 

हिपेटायटीस ही काही प्रमाणात घातक समस्या आहे. हिपेटायटीस असणाऱ्यांनी आरोग्याची योग्य प्रकारे दखल न घेतल्यास त्यांना आरोग्याच्या विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हिपेटायटीस असणाऱ्यांनी तूप जास्त प्रमाणात खाल्ल्यास यकृतावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी तूप टाळलेले चांगले. 

५. कोलेस्ट्रॉल 

कोलेस्टेरॉल ही सध्या बऱ्याच व्यक्तींमध्ये आढळणारी सामान्य समस्या झाली आहे. तूपामध्ये शरीरातील सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि कोलेस्टेरॉलची वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास आहे अशांनी तूप कमी प्रमाणात किंवा न खाल्लेले जास्त चांगले.  तसेच गर्भवती महिलांनीही सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये आणि वजन जास्त प्रमाणात वाढत असल्यास तूप टाळावे. 

Web Title: Avoid Ghee if you have this 5 Health Issues : Ghee is beneficial for health but if you have these 5 problems, be careful while eating ghee, because..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.