Join us

शरीरात रक्त कमी-अशक्तपणा आला? सद्गुरू सांगतात ४ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भराभर वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 13:39 IST

Sadguru Suggest 4 vegetarian Foods To Increase Hemoglobin : सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की रक्ताची कमतरता भासल्यास  कोणती लक्षणं जाणवतात.

भारतात एनिमियाची गंभीर समस्या आहे. लहान मुलं, महिलांना या समस्यांचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे. रिपोर्टनुसार  ६ ते ५९ वर्ष वयोगटातील तरूण मुलं, मुली एनिमियानं पिडीत आहेत.  जवळपास  ५२ टक्के गर्भवती महिला एनिमियानं पिडीत आहेत.  ज्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी आणि लहान मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. (Sadguru Suggest 4 vegetarian Foods To Increase Hemoglobin)

एनिमियाची अनेक कारणं असू शकतात जसं की आयर्नची कमतरता, हिमोग्लोबिन तयार न होणं, योग्य आहार न घेणं, पचनक्रिया सुरळीत नसणं, व्हिटामीन बी-१२, फॉलिक एसिडची कमतरता, गंभीर जखम, सर्जरी किंवा क्रोनिक आजार. ईशा फाऊंडेशनचे फाऊंडर आणि भारतातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यामते जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर याचा अर्थ असा  नाही की तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल. शाकाहारी लोक आपल्या आहारात फक्त सॅलेड, फ्रुट्स खातात  ज्यामुळे एनिमियाचा धोका वाढतो. याशिवाय काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

रक्ताची कमतरता, एनिमियाचे लक्षण

सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की रक्ताची कमतरता भासल्यास  कोणती लक्षणं जाणवतात. शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास थकवा, कमकुवतपणा, त्वचा, नखं आणि डोळ्यांखाली पिवळेपणा, हृदयाची ठोके अनियमित, डोकेदुखी, चक्कर येणं, केस गळणं, मेंदू थकणं यांसारखी लक्षणं जाणवतात.

नट्स

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रोज मूठभर नट्सचे सेवन करायला हवे.  नट्स नॉन हिम आयर्न प्रदान करतात. नट्समध्ये व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात  असते. ज्यामुळे रेड ब्लड सेल्स चांगले राहण्यास  मदत होते.  याशिवाय एनिमियानं पीडित असलेल्या लोकांसाठी हे फार महत्वाचे असते. अनेक नट्समध्ये कॉपर असते. जे आयर्नचं अवशोषण आणि उपयोगासाठी आवश्यक असते. जे एनिमियाच्या सामान्य लक्षणं थकवा, कमकुवतपणाशी लढण्यास मदत करते. 

मोड आलेले पदार्थ

मोड आलेले कडधान्य, डाळी  पोषक तत्वांनी परीपूर्ण असतात आणि एनिमियाशी लढण्यास मदत करतात.  हे शरीरात हिमोग्लोबीन आणि लाल रक्त पेशी वाढण्यास मदत करतात. स्प्राऊट्स नॉन हिम आयर्नचा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबीन वाढते. यात उत्तम प्रमाणात फॉलेट असते. 

चेहऱ्यावर पिंपल्स आलेत-डलनेस दिसतो? झोपताना हे तेल लावा, १५ दिवसांत दूर होतील पिंपल्स

ब्रेकफास्ट सिरियल्स

ब्रेकफास्ट सिरियल्स एनिमिया कंट्रोल करण्यास फायदेशीर ठरतात. यात आयर्न, फॉलेट आणि व्हिटामीन बी-१२ यांसारखी तत्व असतात. फोर्टिफाईड सिरियल्स आयर्नचा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे हिमोग्लोबीन लेव्हल चांगली राहण्यास मदत होते. यातील फॉलिक एसिड निरोगी आरबीसी बनवण्यास मदत करतात आणि फॉलेटच्या कमतरतेमुळे होणारे आजार टाळण्यास मदत होते. 

ओटीपोट सुटले, दंड ओघळले? पाहा सद्गुरुंचा सल्ला, वजन वाढण्याचे आरोग्यासह मनावर होतात गंभीर परिणाम..

मध

जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला एनिमिया असेल तर असेल रोज १ चमचा मध खाऊ घालायला हवं. असं केल्यानं काही दिवसांतच हिमोग्लोबीन वाढेल.

टॅग्स : अ‍ॅनिमियाहेल्थ टिप्सआरोग्य