Join us   

सतत थकवा येतो? रक्त वाढवण्यासाठी खा ५ पदार्थ; हाडं-मसल्स होतील मजबूत, निरोगी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 5:53 PM

Foods That May Help Increase Haemoglobin (Rakt vadhavane upay) : शेवग्याच्या पानांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आयर्न, व्हिटामीन ए, सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात  मिळते.

रक्ताची कमतरता शरीरात कोणत्याही वयात उद्भवू शकते. शरीरात रक्ताची कमतरता होण्याच्या स्थितीला एनिमिया असं म्हणतात. (How to Increase Hemoglobin) एनिमिया झाल्यानंतर थकवा येणं,  कमकुवतपणा, डोकेदुखी अशी लक्षणं जाणवतात. छातीत उजव्या बाजूला दुखणं, केस आणि नखं खराब होणं, ताप येणं, पोलिओ अशी गंभीर लक्षणं दिसून येतात. (How to Raise Your Hemoglobin Count)

शरीरात रक्ताची कमतरता भासू नये यासाठी आयुर्वेदीक डॉक्टर दिक्षा भावसार यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत. आयर्नयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होईल. (Top Hemoglobin Foods That can Increase your Hemoglobin Naturally)

शेवग्याच्या शेंगा आणि पानं

शेवग्याच्या पानांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आयर्न, व्हिटामीन ए, सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात  मिळते. रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप किंवा मधासह १ चमचा मोरींगा पावडर घ्या. रक्ताची कमतरता दूर करण्यास हा प्रभावी उपाय आहे.

रोज नाश्त्याला काय खाता? माधुरीचे पती डॉ. नेने सांगतात नाश्ता करण्याच्या ५ टिप्स- निरोगी राहाल

खजूर, अंजीर आणि मनूके

या तिन्ही पदार्थांमध्ये आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर आणि व्हिटामीन ए, सी मोठ्या प्रमाणात असते. नाश्त्याला रात्री  पाण्यात भिजवलेले खजूर, २ अंजीर आणि एक मोठा चमचाभर मनूके खा. ज्यामुळे तुम्हाला उर्जा मिळेल आणि आयर्नचे प्रमाण वाढेल.

काळे तीळ

काळ्या तिळात  जस्त,  सेलेनियम आणि व्हिटामी बी ६, फॉलेट असते. जवळपास चमचाभर काळे तिळ भाजून खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते. शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढवण्यासाठी नियमित या पौष्टीक लाडूंचे सेवन करावे.

पोट, मागचा भाग सुटलाय? ५ उपाय करा, झरझर घटेल वजन, जीम-डाएट न करता फिट राहाल

व्हिटग्रास

हा पदार्थ बीटा-कॅरोटीन, व्हिटामीन के, फॉलिक एसिड, कॅल्शियम, आयर्न,  प्रोटीन आणि फायबर्स, व्हिटामीन ,सी, व्हिटामीन बी चा उत्तम स्त्रोत आहे. यात अनेक रक्त तयार करणारे घटक असतात. रोज  सकाळी व्हिटग्रास ज्यूसचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती सुधारते.

बीट आणि गाजर

गाजर, बीट या दोन्ही पदार्थांमध्ये आयर्नचे प्रमाण अधिक असते. जेवताना हे पदार्थ ताटात असायलाच हवेत. यामुळे फक्त रक्तच वाढत नाही तर दृष्टीसुद्धा चांगली राहते. एका ब्लेंडरमध्ये जवळपास १ कप उकळलेलं बीट, गाजर घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर गाळून घ्या. त्यात एक चमचाभर लिंबाचा रस मिसळा. नियमित सकाळच्यावेळी हा रस प्यायल्याने रक्त वाढते. लिंबाच्या रसाने व्हिटामीन सी चे प्रमाण वाढते 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स