Join us   

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय; रक्त वाढेल, ठणठणीत राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 2:19 PM

Baba Ramdev healing anemia using yoga and diet tips : ज्या लोकांना त्यांच्या दैनंदिन आहारात लोह, व्हिटॅमिन बी-12, फोलेट आणि तांबे यांसारखे पोषक तत्व पुरेसे मिळत नाहीत त्यांना लोहाच्या कमतरतेचा धोका जास्त असतो.

रोजच्या दगदगीमुळे अंगात रक्त कमी झाल्याचा त्रास अनेकांना जाणवतो.  शरीरात रक्ताची कमतरता भासल्यासा एनिमिया सारखी स्थिती उद्भवते. सतत थकवा येणं, कमकवत शरीर, अशक्तपणा ही लक्षणं जाणवतात. एनिमियाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर स्थिती उद्भवू शकते. (How to increase haemoglobin) आहारातील पोषक तत्वांच्या कमतरतेपासून अनेक प्रकारचे रोग या समस्येचे कारण असू शकतात.  अशक्तपणाच्या उपचारांमध्ये पूरक ते इतर वैद्यकीय उपाय वापरले जातात. (Treat anemia and increase haemoglobin in body with healthy diet,)

बाबा रामदेव यांच्यामते हिमोग्लोबिन आपल्या हाडांच्या आत तयार होते. ऑक्सिजन शरीरातील सांध्यामध्ये जाते. ज्यामुळे हिमोग्लोबिन तयार होते. अशा स्थितीत जेव्हा शिरांमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो. यातून अॅनिमियाची समस्या उद्भवते. त्यामुळे त्याची रक्तातील कमतरता निर्माण होते. स्वामी रामदेव यांच्या मते, काही योगासन केल्याने काही दिवसांत तुम्हाला या समस्येपासून 100 टक्के आराम मिळू शकतो.

ज्या लोकांना त्यांच्या दैनंदिन आहारात लोह, व्हिटॅमिन बी-12, फोलेट आणि तांबे यांसारखे पोषक तत्व पुरेसे मिळत नाहीत त्यांना लोहाच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. हे सर्व पोषक तत्व शरीरातील लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात. यामुळेच आरोग्य तज्ज्ञ लोकांसाठी आरोग्यदायी आणि पौष्टिक असलेल्या गोष्टींच्या सेवनावर भर देतात. आहार योग्य ठेवल्यास अशा समस्या टाळता येतात.

१) अनुलोम विलोम - दररोज अर्धा तास करा.

२) भस्त्रिका - अर्धा तास करा.

३) कपालभाती - अर्धा तास करा. असे केल्याने अशक्तपणा दूर होण्यासोबतच शरीरातील इतर आजारांपासूनही सुटका मिळेल.

४) भ्रामरी हे दररोज 3 ते 5 वेळा करा.

५) उगीथ - हे दररोज 3 ते 5 वेळा करा.

६) मांडूकासन- हे आसन केल्याने अशक्तपणा दूर होतो. यासोबतच डायबिटीज, अॅसिडिटी या समस्यांपासूनही आराम मिळेल.

७) उत्थान पद्मासन- हे आसन देखील दररोज किमान ५ मिनिटे करावे.

८) सूर्यनमस्कार – रोज ५ मिनिटे करा. यामुळे तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहील.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स