Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कमी वयात मुलींना पाळी येऊ नये म्हणून ५ व्यायाम, रोज करायला लावा- वजनही वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 14:13 IST

5 Yoga Poses For Girls: मुलींना कमी वयात पाळी येण्याचं प्रमाण हल्ली खूप वाढलं आहे. आपल्या लेकीच्या बाबतीत हे टाळायचं असेल तर तिला काही व्यायाम रोज नियमितपणे करायला लावा...(how to avoid early periods in girls?)

काही वर्षांपुर्वीचा काळ असा होता की मुलींना साधारण त्या आठवी, नववी, दहावी या इयत्तांमध्ये गेल्यावर पाळी यायची. पण आता मात्र पाळी येण्याचं वय खूप अलिकडे आलं आहे. अगदी तिसरी, चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलींना पाळी आल्याच्या कित्येक घटना कानावर येत आहेत. हे असं सगळं आजुबाजुला घडत असताना आपल्या लेकीच्या बाबतीत असं काही होऊ नये म्हणून कित्येक पालक चिंचेत असतात. तुम्हाला तुमच्या मुलीच्या बाबतीत हे टाळायचं असेल तर तिच्याकडून काही व्यायाम नियमितपणे करून घ्या, असं योग अभ्यासक सांगत आहेत. हे व्यायाम करण्यासाठी अगदी ५ ते ७ मिनिटांचा वेळही पुरेसा आहे. ते व्यायाम नेमके कोणते आणि कसे करायचे ते पाहुया...(exercises that helps to avoid early periods in girls)

 

मुलींना लवकर पाळी येऊ नये म्हणून कोणते व्यायाम करून घ्यावे?

१. मुलींना कमी वयात मासिक पाळीचा त्रास सुरू होऊ नये म्हणून त्यांच्याकडून कोणते व्यायाम करून घ्यायला  हवे याविषयीची  माहिती योग अभ्यासकांनी kyrayogachennai या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला व्यायाम  म्हणजे मलासन. सकाळी रिकाम्या पोटी हा व्यायाम मुलींकडून नियमितपणे करूनघ्या.

अंगाला येणारा घाम आणि घामाचा वास सांगतो शरीरात काय बिघडतंय, दिसायला फिट पण तुम्ही आजारीच..

२. दुसरं म्हणजे बटरफ्लाय पोझिशन. यासाठी जमिनीवर ताठ बसा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून तळपाय एकमेकांना जोडून घ्या. यानंतर मांडीपासून पाय वर उचला- पुन्हा जमिनीला टेकवा. अशी क्रिया १० ते १५ वेळा करा.

 

३. तिसरं आसन करण्यासाठी जमिनीवर ताठ बसा. दोन्ही पाय लांब करून पायामध्ये अंतर या. यानंतर दोन्ही हातांनी उजवा तळपाय पकडून डोकं उजव्या गुडघ्यावर टेकवा. यानंतर डावा तळपाय दोन्ही हातांनी पकडून डाव्या गुडघ्यावर डोकं टेकवा. असं दोन्हीकडून साधारण ५ ते १० वेळा करा.

गाड्यावर मिळते तशी चटपटीत भेळ घरी जमतच नाही? बघा खास ट्रिक, भेळ होईल एकदम चवदार

४. भुजंगासन, सुर्यनमस्कार, नौकासन असे व्यायामही मुलींकडून नियमितपणे करून घ्या. याशिवाय त्यांचे मैदानी खेळांचे प्रमाण वाढवा. स्विमिंग, सायकलिंग असे व्यायामही मुलींकडून करून घ्या. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यलहान मुलंव्यायाम