Join us

घरातील ओला कचरा म्हणजे सोने! 'असा ' करा वापर, तुमची बागही जाईल बहरून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2025 08:10 IST

Wet household waste is gold! Use it like this, your garden will also bloom : घरातील ओल्या कचऱ्यापासून तयार करा मस्त खत. बाजारी खतांपेक्षा दर्जाही चांगलाच.

आता जवळपास सागळीकडेच सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळा ठेवण्याबाबत सूचना दिल्या जातात. लोक ते पाळतात की नाही हा वेगळा मुद्दा झाला. (Wet household waste is gold! Use it like this, your garden will also bloom..)मात्र आता सफाई कर्मचारी कचरा घेऊन जाताना, वेगवेगळा ठेवत जा असे सांगतात. त्यानुसार आपण दोन कचऱ्याचे डबे ठेवतो. एकामध्ये ओला कचरा दुसर्‍यामध्ये सुका कचरा असं विभाजन करतो. सुका कचरा आपण वाचवतो आणि भंगारवाल्यालाही देतो. (Wet household waste is gold! Use it like this, your garden will also bloom..)मात्र ओला तसाच फेकला जातो. कारण आपल्याला वाटतं त्याचा काहीस उपयोग करता येणार नाही. मात्र तसे नसून हा ओला कचरा आपल्याला खतासाठी वापरता येतो. 

झाडांसाठी आपण खते विकत आणतो. ती भेसळयुक्त आहेत की नाही, याची काही खात्री  देता येत नाही.(Wet household waste is gold! Use it like this, your garden will also bloom..) निम्न दर्जाच्या खतामुळे रोपांचे आयुष्य कमी होते. असे होऊ नये यासाठी घरीच छान खत तयार करा. 

कृती१. सगळा ओला कचरा जरा चाळून घ्यायचा. कोबीचा पांढरा भाग किंवा कच्चा बटाटा वगैरे असेल तर काढा. कारण त्याचे विघटन व्हायला जास्त वेळ लागतो. अति वेळ जर का खत तसेच ठेवले तर वास फारच जास्त घाण येतो.

२. मातीचं एक मडकं घ्या. त्याला खाली एक लहानसं भोक पाडून घ्या. त्या मडक्याच्या तळाशी सुक्या पानांचा एक थर तयार करून घ्या. वाळलेला पाला-पाचोळा गोळा करून आणायचा. पुठ्ठा असेल तर तोही वापरा. पुठ्याचे तुकडे करा आणि ते त्यामध्ये टाका. 

३. आता भाज्यांची साले, काड्या, इतर जो काही ओला कचरा आहे, तो त्या मडक्यामध्ये ओता. मांसाहारी पदार्थ अजिबात वापरू नका. तसेच फारच वास येईल असेही पदार्थ वापरू नका. 

४. त्यामध्ये ईडलिंबाची पाने घालायची. या पानांमुळे त्याला कीड लागत नाही. त्यामध्ये काळ्या मातीचा ही वापर करा. कचऱ्यावर एक थर मातीचा लावायचा. त्यावर पुन्हा पाला घालायचा.

५. त्यामध्ये विघटन क्रिया लवकर व्हावी यासाठी दही घाला. दोन चमचे दही चिक्कार झाले. सगळ्यात वरच्या थराला सुका पाला लावायचा. त्यावर थोडं पाणी शिंपडून घ्यायचे. आता ते मडकं कागदाने झाकून घ्या. वरती झाकण लावा आणि मडकं बाजूला ठेवा. त्याखाली एक डब्बा ठेवा म्हणजे पाणी त्यात पडेल. दर आठवड्याला त्यात एक ढवळा माराचया.

६. दिड ते दोन महिन्यांमध्ये उत्तम असे घरगुती खत तयार होते. 

टॅग्स :बागकाम टिप्सकिचन टिप्सस्वच्छता टिप्सभाज्याफळे