Lokmat Sakhi >Gardening > झाडं खूपच सुकली? घ्या १ चमचा बेकिंग सोडा- बघा कसं पालटून जाईल झाडांचं रूप

झाडं खूपच सुकली? घ्या १ चमचा बेकिंग सोडा- बघा कसं पालटून जाईल झाडांचं रूप

Gardening Tips Using Baking Soda: झाडांसाठी बेकिंग सोडा म्हणजे एक उत्तम टॉनिक असून बाग फुलविण्यासाठी त्याचा कसा वापर करायचा ते आता पाहूया...(home hacks for better plant growth)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2023 10:24 AM2023-12-17T10:24:57+5:302023-12-18T15:22:39+5:30

Gardening Tips Using Baking Soda: झाडांसाठी बेकिंग सोडा म्हणजे एक उत्तम टॉनिक असून बाग फुलविण्यासाठी त्याचा कसा वापर करायचा ते आता पाहूया...(home hacks for better plant growth)

Use of baking soda for gardening, How to use baking soda for plants? Gardening tips using baking soda, home hacks for better plant growth | झाडं खूपच सुकली? घ्या १ चमचा बेकिंग सोडा- बघा कसं पालटून जाईल झाडांचं रूप

झाडं खूपच सुकली? घ्या १ चमचा बेकिंग सोडा- बघा कसं पालटून जाईल झाडांचं रूप

Highlightsहे सगळे उपाय आठवड्यातून एकदा करावेत. झाडांसाठी नक्कीच खूप फायदा होईल. 

ढोकळा, केकचे वेगवेगळे प्रकार, पिझ्झा बेस असे अनेक पदार्थ छान फुलविण्यासाठी बेकिंग सोड्याचा कसा वापर करायचा ते आपल्याला माहितीच आहे. खाण्यासोबतच वेगवेगळ्या स्वच्छतेच्या कामांसाठीही बेकिंग सोड्याचा छान उपयोग करता येतो (How to use baking soda for plants?). आता आपली बाग फुलविण्यासाठी बेकिंग सोड्याचा कसा वापर करायचा ते आता पाहूया (Gardening tips using baking soda).. झाडांची पानं सुकली असतील, बाग छान हिरवीगार- टवटवीत दिसत नसेल तर अशावेळी बेकिंग साेड्याचा खूप छान उपयोग करता येतो.(Use of baking soda for gardening)

 

झाडांसाठी कसा करायचा बेकिंग सोड्याचा वापर?

झाडांसाठी बेकिंग सोड्याचा वापर कसा करायचा, याविषयीची माहिती garden_hacks_tips या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

नाश्त्यासाठी करून पाहा स्वीटकॉर्न पराठा! खमंग, कुरकुरीत- चवदार, मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम

यामध्ये दिलेल्या माहितीनुसार झाडांच्या पानांना अधिक हिरवागार चमकदार रंग येण्यासाठी, झाडांना किंवा कुंडीमध्ये जर किडे- मुंग्या झाल्या असतील तर त्यासाठी किंवा झाडांची चांगली वाढ होऊन भरपूर फुलं येण्यासाठी बेकिंग सोड्याचा कसा वापर करायचा, याविषयीची माहिती दिली आहे.

कित्येक वर्षांपासून जुनाच तिखट- मीठाचा डबा वापरता? करा थोडासा बदल- बघा ३ सुंदर आकर्षक पर्याय...

एका ग्लासमध्ये ४०० मिली पाणी घ्या. त्यामध्ये १० ग्रॅम बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि मग झाडांच्या पानांवर शिंपडा. यामुळे झाडांच्या पानांना छान हिरवागार, चमकदार रंग येतो. झाडांची पानं सुकली असतील तर त्यांना छान टवटवीतपणा येण्यास मदत होते.

 

मातीमध्ये किंवा झाडाच्या बुंध्याला किडे- मुंग्या झाल्या असतील तर २० ग्रॅम बेकिंग सोडा, १ टेबलस्पून व्हिनेगर, ४०० ग्रॅम पाण्यामध्ये मिसळा. हे पाणी जिथे किडे लागले असतील तिथे फवारा. झाडांच्या आजुबाजुला किंवा मातीमध्ये किडे- मुंग्या फिरकणार नाहीत.

ऐन विशीतच खूप केस पांढरे झाले? मुठभर कडिपत्त्याचा हा उपाय लगेच करा- पांढरे केसही होतील काळे 

झाडांची चांगली वाढ होत नसेल तर ३० ग्रॅम बेकिंग सोडा, १ टेबलस्पून साखर ४०० ग्रॅम पाण्यात मिसळा. सोडा आणि साखर पाण्यात चांगली विरघळली की हे पाणी झाडांना द्या. झाडांची चांगली वाढ होईल.

हे सगळे उपाय आठवड्यातून एकदा करावेत. झाडांसाठी नक्कीच खूप फायदा होईल. 

 

Web Title: Use of baking soda for gardening, How to use baking soda for plants? Gardening tips using baking soda, home hacks for better plant growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.