lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > ढगाळ वातवरणात इनडोअर प्लांट्स कोमेजले? ३ टिप्स, झाडं फुलतील मस्त

ढगाळ वातवरणात इनडोअर प्लांट्स कोमेजले? ३ टिप्स, झाडं फुलतील मस्त

3 Gardening Tips For Indoor Plants In Rainy Days: पावसाळ्यात इनडोअर प्लांट्सची काळजी कशी घ्यावी? यासाठी या काही टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2023 05:58 PM2023-09-12T17:58:30+5:302023-09-12T17:59:55+5:30

3 Gardening Tips For Indoor Plants In Rainy Days: पावसाळ्यात इनडोअर प्लांट्सची काळजी कशी घ्यावी? यासाठी या काही टिप्स...

How to take care of indoor plants in monsoon? 3 Gardening tips for indoor plants  | ढगाळ वातवरणात इनडोअर प्लांट्स कोमेजले? ३ टिप्स, झाडं फुलतील मस्त

ढगाळ वातवरणात इनडोअर प्लांट्स कोमेजले? ३ टिप्स, झाडं फुलतील मस्त

Highlightsपावसाळा आला की इतर रोपटी मात्र भरपूर पाणी पिऊन सुखावून जातात. पण त्याच्या अगदी उलट इनडोअर प्लांट्सचं होतं.

इनडोअर प्लांट्स इतर रोपट्यांच्या तुलनेत नाजूक असतात. त्यामुळे त्यांची काळजी थोडी वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. या झाडांना जसं खूप ऊन सहन होत नाही, तशी खूप सावलीही चालत नाही. पाणीही अगदीच मोजून मापून घालावं लागतं. एरवी पावसाळा आला की इतर रोपटी मात्र भरपूर पाणी पिऊन सुखावून जातात. पण त्याच्या अगदी उलट इनडोअर प्लांट्सचं होतं. त्यांना थोडं जरी पाणी जास्त झालं, तरी ते लगेच कोमेजून जातात (How to take care of indoor plants in monsoon?). म्हणूनच ऊन कमी, पाऊस जास्त अशा ढगाळ वातावरणात इनडोअर प्लांट्सला कसं जपायचं, यासाठी बघा या काही खास टिप्स...(3 Gardening tips for indoor plants) 

 

पावसाळ्यात इनडोअर प्लांट्सची कशी काळजी घ्यावी
१. जागा बदला

इनडोअर प्लांट्स असली तरी ती आपण नेहमीच घरात ठेवू शकत नाही. सुर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी सावलीत ठेवणं त्यांना गरजेचं असतं.

पावसाळ्यात मुलांना लगेच सर्दी होते? १ सोपा उपाय, वारंवार इन्फेक्शन होणार नाही- सर्दीचा त्रास होईल कमी

त्यामुळे तुम्ही जर थोडासा आडोसा पाहून अंगणात, बाल्कनीत इनडोअर प्लान्ट सावलीत ठेवलं असेल तर पावसाळ्यात त्यांना थेट पाऊस लागत तर नाही ना, हे बघा. पाऊस लागत असेल तर लगेचच त्यांची जागा बदला.

 

२. माती ओलसर ठेवा
आपण पावसाळ्यात इनडोअर प्लांट्स अनेकदा सावलीत ठेवून देतो आणि नंतर मात्र त्यांना पाणी घालायचंच विसरून जातो. त्यामुळे मग ते सुकायला सुरुवात होते.

‘वाटलं होतं मी कधीच आईच होऊ शकणार नाही!’ शिल्पा शेट्टीला असा कोणता दुर्मिळ आजार झाला होता?

त्यामुळे त्यांची माती थोडीशी ओलसर राहील एवढी फक्त काळजी घ्या. ३ ते ४ दिवसांनी २ टेबलस्पून पाणी घातलं तरी त्यांना ते पुरेसं आहे.  

 

३. शक्यतो घरात ठेवू नका
पावसाळ्यात घरातही स्वच्छ सुर्यप्रकाश येत नाही. घरातही दमट वातावरण असतं.

सतत अर्ध डोकं ठणकतं, मायग्रेनचा त्रास? ६ आयुर्वेदिक उपाय, डॉक्टर सांगतात..

त्यामुळे पावसाळ्यात सहसा इनडोअर प्लान्ट घरात ठेवूच नये. अंगणात, टेरेसमध्ये आडोसा बघूनच त्यांना ठेवा. 
 

Web Title: How to take care of indoor plants in monsoon? 3 Gardening tips for indoor plants 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.