lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > उन्हामुळे तुळस सुकली- पानं पिवळी पडली? किचनमधला 'हा' पदार्थ घाला, हिरवीगार होईल तुळस

उन्हामुळे तुळस सुकली- पानं पिवळी पडली? किचनमधला 'हा' पदार्थ घाला, हिरवीगार होईल तुळस

How To Grow Tulsi At Home : उन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीची वाढ चांगली होते. या वातावरणात रोपं सुकू लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 01:33 PM2024-04-15T13:33:59+5:302024-04-15T19:23:35+5:30

How To Grow Tulsi At Home : उन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीची वाढ चांगली होते. या वातावरणात रोपं सुकू लागतात.

How To Grow Tulsi At Home : How To Grow Tulsi Plant At Home Tulsi Plant Growth Tips | उन्हामुळे तुळस सुकली- पानं पिवळी पडली? किचनमधला 'हा' पदार्थ घाला, हिरवीगार होईल तुळस

उन्हामुळे तुळस सुकली- पानं पिवळी पडली? किचनमधला 'हा' पदार्थ घाला, हिरवीगार होईल तुळस

तुळशीला धार्मिकदृष्या फार महत्व आहे याशिवाय तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. प्रत्येक भारतीय घरांमध्ये तुळशीचं रोपं नक्कीच दिसून येतं.  (How to Grow Tulsi At Home) उन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीची वाढ चांगली होते. या वातावरणात रोपं सुकू लागतात. ऊन्हाळ्याच्या दिवसांच तुळशीच्या रोपाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर रोप सुकू लागते. (Tulsi Growth Tips) मार्केटमध्ये तुम्हाला अनेक प्रकारची खतं पाहायला मिळतील काही केमिकल्सयुक्त खतांच्या वापराने रोपाचे नुकसान होऊ शकते. (Summer Gardening Tips) तुम्ही घरच्याघरी काही नैसर्गिक खतांचा वापर करून  तुळस बहरलेली ठेवू शकता. (Tulsi Plant Growth Tips)

मॅजिक ब्रिक्सच्या रिपोर्टनुसार तुळस घराच्या बागेत सहज वाढवता येते. तुळशीच्या इतर प्रकारांप्रमाणे तुळशीला बाहेर उगवणं खूपच सोपं आहे. परंतु ज्या ठिकाणी ऊबदार तापमान असते अशा ठिकाणी तुळस ठेवायला हवी.  तुळस लावण्यासाठी कोरड्या मातीचा वापर करू नये. माती मॉईश्चराईज असावी, ऑर्गेनिक फर्टिलायजरचा वापर केल्याने तुळशीचे झाड जास्त हेल्दी होईल. 

तुळशीसाठी केमिकल फ्री खत कोणतं?

शेण एक प्राकृतिक आणि सगळ्यात सहज मिळणारं खत आहे. जे पोषक तत्वांनी परीपूर्ण असते. घरच्याघरी हे खत तयार करण्यासााठी तुम्ही गाय किंवा म्हशीचे शेण एकत्र करू शकता.  एकत्र ठेवून त्यात सुकलेलं गवत घाला आणि पानं मिक्स करा. हे मिश्रण झाकून काही आठवड्यांसाठी तसंच ठेवून द्या.  हे पूर्णपणे सडल्यानंतर खत तयार झालेले असेल याशिवाय तुम्ही शेण सुकवूनही खत बनवू शकता.

टाकीत न उतरता फक्त ५ मिनिटांत टाकी स्वच्छ करा; सोप्या ट्रिक्स वापरा, वेळ-मेहनत दोन्ही वाचेल

यात फॉस्फोरस आणि पोटॅशिमय भरपूर असते. जे तुळशीच्या रोपाच्या वाढीस मदत करते. हे तयार करण्यासाठी झेंडूची फुलं एकत्र करून सुकवून घ्या. नंतर ते वाटून त्याची पावडर बनवून घ्या नंतर ही पावडर थेट मातीत मिसळा.  पाण्यात मिसळून तुळशीच्या रोपात घाला. 

भाज्यांचे सालीचे खत

तुळशीच्या  रोपाच्या चांगल्या वाढीसाठी घरच्याघरी भाज्यांच्या सालींचे खत तयार करू शकता.  यासाठी सर्व सालं एकत्र करा. त्यात चहा पावडर एका भांड्यात काढून महिन्याभरासाठी तसंच सोडून द्या.  रोपांना घालण्यासाठी खत तयार झालेले असेल. याव्यतिरिक्त तुम्ही केळ्याच्या सालीचे खतही तयार करू शकता. 

केस पिकलेत? डाय अजिबात नको वाटतो; १ चमचा चहा पावडरचं खास तेल लावा, दाट होतील केस

तुळशीच्या रोपात खत कसे घालावे?

तुळशीच्या रोपात खत घालण्याआधी रोपातील माती मॉईश्चराईज आहे की नाही ते पाहा.  खत रोपात घालताना मुळांच्या वर घाला.  कारण मुळांजवळ खत घातल्याने रोप सडू शकते. तुळशीच्या रोपात खूप जास्त खत घालू नका. कारण यामुळे मुळं जळू शकतता. ऊन्हाळ्याच्या दिवसांत २ ते ३ आठवड्यात खत घालत राहा.

Web Title: How To Grow Tulsi At Home : How To Grow Tulsi Plant At Home Tulsi Plant Growth Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.