लिंबाचं रोप (Lemon Plant) बरेचजण आपल्या बाल्कनीत लावतात. जेणेकरून रसाळ लिंबं घरीच मिळतील. पण या रोपाला फुलं, फळं येत नाही अशी अनेकांची तक्रार असते (Easy Way To Grow Lemon Tree). याच कारणामुळे बरेचजण घरी रोपं लावायला नाही म्हणतात. गार्डनिंग एक्सपर्ट्सनं एक जादूई उपाय सांगितला आहे. ज्यामुळे तुमच्या घरातलं लिंबाचं रोप चांगलं बहरेल.या पद्धतीत एका खास पांढऱ्या पावडरचा वापर केला जातो. जे रोपांच्या पोषणासाठी आवश्यक असते. यासाठी मातीचं परफेक्ट मिश्रण तयार करून योग्य पॉटची निवड करा. माळीनं सांगितलेल्या या ट्रिकचा वापर करून तुम्ही घरातलं लिंबाचं रोप चांगलं फुलवू शकता. (What Is Best Way To Grow Lemon Plant At Home)
सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे योग्य लिंबांची निवड करणं, गार्डनिंग एक्सपर्ट्सच्या मते तुम्ही घरात लावण्यासाठी देशी लिंबांची निवड करायला हवी. कारण ते सहज वाढतात आणि लिंबसुद्धा जास्त येतात. देशी लिंबांची पानं पातळ असतात. या लिंबाचं तुम्ही लोणचंही घालू शकता.
लिंबाच्या रोपासाठी तुम्ही कोणती कुंडी निवडता हेसुद्धा महत्वाचं असतं. लिंबाची मुळं पसरतात त्यासाठी १४,१६ किंवा १८ इंचाच्या कुंडीत लावा. जर १२ इंचाची कुंडी असेल तर कुंडी एका वर्षातच बदलावी लागेल. हे रोप वाढवण्यासाठी तुम्ही ग्रो बॅग किंवा मातीच्या कुंडींचा वापर करू शकता ज्यात हवेचा संचार व्यवस्थित होतो. सिमेंटची कुंडी हा उत्तम पर्याय आहे.
रोपाला नर्सरीतून आणल्यानंतर लगेच कुंडीत लावणं गरजेचं आहे. तुम्ही ९० टक्के गार्डन सॉईल, १० टक्के कंपोस्ट खत याचं मिश्रण तयार करू कुंडीत भरू शकता. ज्यामुळे रोपाच्या मुळांना बुरशी लागणार नाही. नर्सरीतून आणलेली रोपं कुंडीत घालून पाणी घालत राहा. लिंबाच्या रोपाला वेळोवेळी पोषण देणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही असं रोप लावाल तेव्हा थोडं शेण किंवा वर्मी कंमोस्ट घाला यामुळे रोपांना व्यवस्थित पोषण मिळेल. नंतर तुम्ही मातीच्या वरच्या भागावर खत परसवू शकता.
लिंबाच्या रोपाच्या वाढीसाठी माळीनं सांगितलेली खास ट्रिक कोणती?
2 रूपयांचे एप्सम सॉल्ट घालून तुम्ही लिंबाचं रोप भरगच्च भरू शकता. एप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम असते. जे रोपांना क्लोरोफिल तयार करण्यास मदत करते आणि अकाली फुलं गळणं थांबवते. अर्धा चमचा एप्सम सॉल्ट एक लिटर पाण्यात मिसळा. अमेरीकन सि सॉल्ट कंपनीच्या रिपोर्टनुसार ऑर्गेनिक शेतीसाठी एप्सम सॉल्टचा वापर फायदेशीर ठरतो (Ref). हे परवडणारे खत असून घराच्या किंवा शेतीच्या दोन्ही रोपांसाठी फायदेशीर ठरते. फुलांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी एप्सम सॉल्ट वापरणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे. दर ३ महिन्यातून एकदा हे घाला. जर तुमच्या घरी खारं पाणी येत असेल तर एप्सम सॉल्टचा वापर कमी करा किंवा करूच नका. कारण यामुळे मातीत मिठाचे प्रमाण वाढू शकते.