lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > जास्वंदाला फुलं येतच नाहीत? यापैकी १ उपाय करा, रोपावरची फुलं कधीच कमी होणार नाहीत

जास्वंदाला फुलं येतच नाहीत? यापैकी १ उपाय करा, रोपावरची फुलं कधीच कमी होणार नाहीत

Best Fertilizers For Jaswand Plant: जास्वंदाला फुलंच येत नसतील तर हे काही उपाय पाहा आणि त्यापैकी तुम्हाला सोपा वाटेल तो कोणताही उपाय करा... (how to get maximum flowers from hibiscus plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 01:38 PM2024-05-08T13:38:57+5:302024-05-08T13:39:53+5:30

Best Fertilizers For Jaswand Plant: जास्वंदाला फुलंच येत नसतील तर हे काही उपाय पाहा आणि त्यापैकी तुम्हाला सोपा वाटेल तो कोणताही उपाय करा... (how to get maximum flowers from hibiscus plant)

how to get maximum flowers from hibiscus plant, best fertilizers for jaswand plant, what to do for getting maximum flowers? | जास्वंदाला फुलं येतच नाहीत? यापैकी १ उपाय करा, रोपावरची फुलं कधीच कमी होणार नाहीत

जास्वंदाला फुलं येतच नाहीत? यापैकी १ उपाय करा, रोपावरची फुलं कधीच कमी होणार नाहीत

Highlightsहा उपाय नियमितपणे केला तर जास्वंदासोबतच इतरही फुलझाडांना भरभरून फुलं येतील....

जास्वंदाचं मोठं फुललेलं टपोरं फूल पाहिलं की मन कसं प्रसन्न होतं. त्यामुळे बरेच जण त्यांच्या छोट्याशा बागेत जास्वंदाचं एखादं छोटंसं रोप तरी लावतातच. जास्वंदाचं रोप खाली मातीमध्येच लावलं पाहिजे असं काही नाही. कुंडीमध्येही तुम्ही ते लावू शकता. कुंडीतल्या रोपाची व्यवस्थित काळजी घेतली आणि त्याला वेळेवर खत पाणी घातलं तरी त्याची चांगली वाढ होऊन त्याला भरपूर फुलं येऊ शकतात (best fertilizers for jaswand plant-). त्यासाठी नेमकं काय करायचं आणि जास्वंदाला नेमकं कोणतं खत घालायचं, ते पाहा....(how to get maximum flowers from hibiscus plant)

 

जास्वंदाला भरपूर फुलं येण्यासाठी कोणते खत घालावे?

जास्वंदाला भरपूर फुलं येण्यासाठी कोणते खत घालावे, याविषयीचा एक व्हिडिओ _royal__garden_ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

गरोदरपणात आईच्या आहारात लोहाची कमतरता बाळासाठी घातक; थॅलेसीमियाचा धोका टाळण्यासाठी...

या व्हिडिओनुसार तुमच्या जास्वंदाच्या झाडाला वाढीसाठी ४ पदार्थ आवश्यक आहेत. ऑर्गेनिक डॅप, कडुलिंबाची पावडर, एप्सम सॉल्ट आणि बोन मिल हे पदार्थ समप्रमाणात घेऊन एकत्र कालवून घ्या. हे ४ पदार्थ जास्वंदाच्या झाडासाठी उत्तम खत आहेत.

१ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल आलिया- कतरिनासारखा नॅचरल ग्लो- बघा सोपा उपाय...

त्यानंतर कुंडीतली वरची माती थोडीशी उकरून घ्या आणि त्यात हे खत टाका. वरून पुन्हा थोडी माती टाका आणि रोपांना पाणी द्या... महिन्यातून २ वेळा हा उपाय करा. यामुळे जास्वंदाच्या झाडाला नेहमीच भरभरून फुलं येतील.

 

जास्वंदाच्या झाडासाठी खत

केळीची सालं आणि कांद्याच्या टरफलांमध्ये असणारं फॉस्फरस आणि नायट्रोजन जास्वंदाच्या झाडाला फुलं येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा

हा उपाय करण्यासाठी केळीच्या साली आणि कांद्याची टरफलं पाण्यात भिजत घाला. १० ते १२ तास पाण्यात चांगली भिजल्यानंतर पाणी गाळून घ्या आणि ते पाणी झाडांना द्या. हा उपाय नियमितपणे केला तर जास्वंदासोबतच इतरही फुलझाडांना भरभरून फुलं येतील....

 

Web Title: how to get maximum flowers from hibiscus plant, best fertilizers for jaswand plant, what to do for getting maximum flowers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.