Lokmat Sakhi >Beauty > १ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल आलिया- कतरिनासारखा नॅचरल ग्लो- बघा सोपा उपाय...

१ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल आलिया- कतरिनासारखा नॅचरल ग्लो- बघा सोपा उपाय...

How To Get Natural Glow: त्वचेवर नॅचरल ग्लो यावा असं वाटत असेल तर त्यासाठी हा एक साेपा उपाय करून पाहा... (how to get young skin naturally?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2024 11:50 AM2024-05-08T11:50:04+5:302024-05-08T11:51:16+5:30

How To Get Natural Glow: त्वचेवर नॅचरल ग्लो यावा असं वाटत असेल तर त्यासाठी हा एक साेपा उपाय करून पाहा... (how to get young skin naturally?)

how to get natural glow, face tapping method or facial exercise for skin tightning and radiant glow, how to get young skin naturally | १ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल आलिया- कतरिनासारखा नॅचरल ग्लो- बघा सोपा उपाय...

१ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल आलिया- कतरिनासारखा नॅचरल ग्लो- बघा सोपा उपाय...

Highlightsतुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा व्यायाम करा.. बघा चेहरा काही दिवसांतच कसा चमकेल. 

हल्ली आपल्या आहारातून त्वचेला व्यवस्थित पोषण मिळत नाही. शिवाय धूळ, धूर, प्रदुषण, ऊन या सगळ्यांचा त्वचेला रोजच सामना करावा लागतो. त्यामुळे मग त्वचेचा पोत दिवसेंदिवस खराब होत जातो. त्वचेवरची गेलेली चमक पुन्हा आणण्यासाठी आपण वेगवेगळे घरगुती उपचार करतो. किंवा पार्लरमध्ये जाऊन ब्लीच, फेशियल करून येतो. पण यामुळे त्वचा केवळ वरवर स्वच्छ होते. त्वचेला जर आतून पोषण द्यायचे असेल आणि कधीही कमी न होणारा नॅचरल ग्लो मिळवायचा असेल तर थोडा वेळ काढा आणि बसल्याबसल्या हे काही उपाय करा... बघा एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही जास्त तेज तुमच्या चेहऱ्यावर येईल. (face tapping method or facial exercise for skin tightning and radiant glow)

 

त्वचेवर नॅचरल ग्लो येण्यासाठी उपाय

त्वचेवर नॅचरल ग्लो येण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीचा एक व्हिडिओ anupriyaa_srivastavaa
and anlovedrama या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये चेहऱ्याला मसाज करण्याच्या ३ सोप्या पद्धती सांगितल्या आहेत. यामुळे त्वचेखालच्या भागाचे रक्ताभिसरण अधिक उत्तम होते आणि त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. शिवाय यामुळे त्वचेवर सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते. यासाठी नेमक्या कोणत्या पद्धतीने त्वचेला मालिश करायची, ते पाहूया...

बाथरुमची फरशी, भिंती पिवळट पडल्या? १ सोपा उपाय- कमी मेहनतीत बाथरुम चकाचक....

. पिंच मेथड

पिंच म्हणजे चिमटा. त्यामुळे या पद्धतीनुसार चेहऱ्याची त्वचा दोन बोटांमध्ये धरा, हलकीशी ओढा आणि लगेच सोडून द्या. अशा पद्धतीने संपूर्ण चेहऱ्याला १ ते २ मिनिटे मसाज करा.

 

२. स्लॅपिंग मेथड

पिंच मेथड झाल्यानंतर पुढच्या एका मिनिटासाठी त्वचेवर हलक्या हाताने थापटा. अगदी कपाळापासून ते हनुवटीपर्यंत चेहऱ्याचा सगळा भाग कव्हर करा. 

गरोदरपणात आईच्या आहारात लोहाची कमतरता बाळासाठी घातक; थॅलेसीमियाचा धोका टाळण्यासाठी...

३. फिंगर टॅपिंग

तिसरी पद्धत जी आहे त्यामध्ये आपल्याला हाताच्या बोटांच्या टोकांनी चेहऱ्यावर मसाज करायचा आहे. यामध्ये एका ठराविक लयीने बोटांच्या समोरच्या टोकाने चेहऱ्याला मसाज करा. हे देखील १ मिनिटासाठी करावे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा व्यायाम करा.. बघा चेहरा काही दिवसांतच कसा चमकेल. 


 

Web Title: how to get natural glow, face tapping method or facial exercise for skin tightning and radiant glow, how to get young skin naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.