Lokmat Sakhi >Gardening > झाडाची वाढ खुंटली-पानं फुलं गळतात? कुंडीतल्या मातीत करा 'या' भाजीच्या सालांचा वापर; झाड बहरेल..

झाडाची वाढ खुंटली-पानं फुलं गळतात? कुंडीतल्या मातीत करा 'या' भाजीच्या सालांचा वापर; झाड बहरेल..

How do you use potato peels as fertilizer? : बटाट्याची साल फेकून देण्यापूर्वी याचा वापर झाडांवर करून पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2024 10:18 AM2024-06-11T10:18:26+5:302024-06-11T11:06:35+5:30

How do you use potato peels as fertilizer? : बटाट्याची साल फेकून देण्यापूर्वी याचा वापर झाडांवर करून पाहा...

How do you use potato peels as fertilizer? | झाडाची वाढ खुंटली-पानं फुलं गळतात? कुंडीतल्या मातीत करा 'या' भाजीच्या सालांचा वापर; झाड बहरेल..

झाडाची वाढ खुंटली-पानं फुलं गळतात? कुंडीतल्या मातीत करा 'या' भाजीच्या सालांचा वापर; झाड बहरेल..

बटाटा सर्वांना प्रिय. बटाट्याचे अनेक पदार्थ केले जातात (Potato Peel). बटाट्याची भाजी, भजी, पराठे किंवा बटाट्याचा वापर अनेक पदार्थात केला जातो. पण काही लोक बटाटे वापरतात, पण साल फेकून देतात (Gardening Tips). पण बटाट्याच्या सालीमध्ये देखील अनेक पोषण असतात (Fertilizer). याचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करू शकता.

विशेष म्हणजे याचा वापर आपण झाडांच्या वाढीसाठीही करू शकता. झाडांची वाढ अनेकदा खुंटते. पानं पिवळी पडतात. किंवा रोपांना फुल किंवा फळे येत नाहीत. यावर उपाय म्हणून बटाट्याच्या सालींचा खत तयार करा, आणि याचा वापर झाडांवर करा. बटाट्याच्या सालींमध्ये असलेल्या पोषणामुळे झाडांची योग्य वाढ होईल. पण याचा वापर झाडांसाठी कसा करावा? पाहूयात(How do you use potato peels as fertilizer?).

शाळेत जाताना भीतीपोटी मूल रडतं? करा सोप्या ४ गोष्टी; शाळेत रमतील-अभ्यासही करतील

झाडांसाठी बटाट्याच्या सालींमधले फायदे

बटाट्याच्या सालीत कॅल्शियम, व्हिटामिन सी आणि बी कॉम्पलेक्ससोबतच आयर्न देखील भरपूर प्रमाणात आढळते. हे पौष्टीक घटक शरीरासाठी फायदेशीर ठरते. यात मॅग्नेशियम, ऑक्सलेट आणि फायबर आढळते. जे झाडांच्या वाढीसाठी मदत करते.

पिवळ्या दातांमुळे मनमोकळं हसता येत नाही? बेकिंग सोड्याचा करा असरदार उपाय- दात दिसतील स्वच्छ

रोपासाठी बटाट्याची साल कशी वापरावी

कंपोस्ट तयार करण्यासाठी आपण बटाट्याच्या सालीसोबत इतर भाज्यांच्या सालींचा देखील वापर करू शकता. यासाठी एक आठवडा एका डब्यात बटाट्याच्या सालीसोबत इतर भाज्यांच्या साली साठवून ठेवा. सालींमध्ये  नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. जे झाडांच्या वाढीसाठी मदत करते.

आठवडाभरानंतर त्यात पाणी घालून दुसऱ्या डब्यात ट्रान्स्फर करा. पाणी गाळून घ्या, आणि पाणी कुंडीतल्या मातीत घाला. यामुळे झाडांची योग्य वाढ होईल. फळं आणि फुलांनी झाड छान बहरेल.

Web Title: How do you use potato peels as fertilizer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.