Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > रोपं धड वाढतही नाहीत- त्यांना फुलंही येत नाहीत? घ्या घरगुती उपाय- वाढतील जोमात, होतील हिरवीगार 

रोपं धड वाढतही नाहीत- त्यांना फुलंही येत नाहीत? घ्या घरगुती उपाय- वाढतील जोमात, होतील हिरवीगार 

How to Make Fertilizer at Home?: हा उपाय जर काही दिवस तुम्ही नियमितपणे केला तर इतर कोणतंही खत न घालताही तुमच्याकडची रोपं छान हिरवीगार होतील...(how to make fertilizer for home garden from kitchen waste?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2025 14:29 IST2025-12-05T14:28:04+5:302025-12-05T14:29:31+5:30

How to Make Fertilizer at Home?: हा उपाय जर काही दिवस तुम्ही नियमितपणे केला तर इतर कोणतंही खत न घालताही तुमच्याकडची रोपं छान हिरवीगार होतील...(how to make fertilizer for home garden from kitchen waste?)

home made fertilizer for fast growth of plants, how to make fertilizer at home, how to make fertilizer for home garden from kitchen waste | रोपं धड वाढतही नाहीत- त्यांना फुलंही येत नाहीत? घ्या घरगुती उपाय- वाढतील जोमात, होतील हिरवीगार 

रोपं धड वाढतही नाहीत- त्यांना फुलंही येत नाहीत? घ्या घरगुती उपाय- वाढतील जोमात, होतील हिरवीगार 

Highlightsस्वयंपाक करताना भाज्यांची किंवा फळांची सालं, टरफलं, काड्या, भाज्यांमधल्या बिया असा सगळा ओला कचरा तयार होतच असतो.

बऱ्याचदा आपण असं बघतो की आपल्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये जी काही रोपं लावलेली असतात त्यांची चांगली वाढ होत नाही. किंवा ती रोपं नुसतीच वाढतात, पण त्यांना फुलंच येत नाहीत. आपण हौशीने फुलझाडं लावतो, पण त्यांना क्वचितच कधीतरी फूल येतं आणि त्यामुळे खूप हिरमोड होतो. काही वेळा असंही होतं की रोपांची पानं अजिबातच टवटवीत, हिरवीगार नसतात. सुकलेली, आकार बारीक झालेली दिसतात. अशीच अवस्था जर तुमच्या बागेतल्या रोपांचीही झाली असेल तर आजपासून काही दिवस एक उपाय अगदी नियमितपणे करून पाहा (home made fertilizer for fast growth of plants). हा उपाय जर तुम्ही केला तर रोपांना छान पोषण मिळून त्यांची भराभर वाढ होईल (how to make fertilizer at hom?).. त्यासाठी काय करायचं ते पाहूया...(how to make fertilizer for home garden from kitchen waste?)

 

रोपांची चांगली वाढ होण्यासाठी घरगुती उपाय

रोपांची चांगली वाढ होण्यासाठी आपण त्यांच्यासाठी एक प्रकारचं जादुई पाणी घरीच तयार करणार आहोत. हे पाणी रोपांसाठी एखाद्या औषधाप्रमाणे किंवा टॉनिकप्रमाणे काम करेल आणि त्यामुळे रोपं भराभर वाढून हिरवीगार होतील.

घरी केलेला मसाला पापड ओलसर- वाकडा होतो? विष्णू मनोहर सांगतात हाॅटेलसारखा मसाला पापड करण्याची ट्रिक

यासाठी आपल्या स्वयंपाक घरात मध्यम आकाराची एखादी बादली ठेवा. आता ती बादली अर्धी भरेल एवढं त्यात पाणी घाला. आता आपल्या घरात रोजच सकाळ- संध्याकाळ स्वयंपाक होत असतो. स्वयंपाक करताना भाज्यांची किंवा फळांची सालं, टरफलं, काड्या, भाज्यांमधल्या बिया असा सगळा ओला कचरा तयार होतच असतो.

 

हा सगळा ओला कचरा त्या बादलीत जमा करायचा. दिवसभर, रात्री तो पाण्यात तसाच भिजत झाकून ठेवायचा. दुसऱ्यादिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्यायचं आणि त्यात थोडं साधं पाणी मिसळून ते रोपांना द्यायचं.

१ आठवड्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! 'या' पद्धतीने तांदळाचं पीठ वापरा, बघा कसा उजळेल चेहरा...

हा उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा. बघा तुमची बाग कशी छान टवटवीत होईल आणि फुलझाडं टपोऱ्या फुलांनी बहरून येतील. 

 

Web Title : पौधों के विकास के लिए घर का बना उर्वरक, पाएं हरी-भरी पत्तियां।

Web Summary : क्या आपका बगीचा मुरझाया हुआ है? रसोई के कचरे से पौधों के लिए जादुई टॉनिक बनाएं। पानी में सब्जियों और फलों के छिलके भिगोएं, छानें, पतला करें और अपने पौधों को खिलाएं। नियमित उपयोग से हरे-भरे पौधे खिलेंगे।

Web Title : Revive your plants with this homemade fertilizer for lush growth.

Web Summary : Is your garden lackluster? Create a magical plant tonic using kitchen waste. Soak vegetable and fruit peels in water, strain, dilute, and feed your plants. Regular use promises vibrant, blooming plants.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.