lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतल्या कडीपत्त्याची वाढ खुंटली? मातीत मिसळा तांदुळाचे खत - हिरव्यागार पानांनी बहरेल रोप

कुंडीतल्या कडीपत्त्याची वाढ खुंटली? मातीत मिसळा तांदुळाचे खत - हिरव्यागार पानांनी बहरेल रोप

Growing Curry Leaves - Caring For Curry Leaf Plants : कडीपत्ता कायम पिवळा पडतो? ३ गार्डनिंग टिप्स; झाडाची वाढ होणारच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2024 01:08 PM2024-05-05T13:08:03+5:302024-05-05T13:08:50+5:30

Growing Curry Leaves - Caring For Curry Leaf Plants : कडीपत्ता कायम पिवळा पडतो? ३ गार्डनिंग टिप्स; झाडाची वाढ होणारच..

Growing Curry Leaves - Caring For Curry Leaf Plants | कुंडीतल्या कडीपत्त्याची वाढ खुंटली? मातीत मिसळा तांदुळाचे खत - हिरव्यागार पानांनी बहरेल रोप

कुंडीतल्या कडीपत्त्याची वाढ खुंटली? मातीत मिसळा तांदुळाचे खत - हिरव्यागार पानांनी बहरेल रोप

कडीपता. हा आपल्या स्वयंपाकघरातील अतिशय गुणकारी घटक (Curry Leaves). कडीपत्ता फक्त फोडणीसाठी नसून, याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कडीपत्त्यामुळे निश्चितच जेवणाची चव वाढते. पण याचे इतरही फायदे आहेत. कडीपत्त्यातील विविध पौष्टीक घटक केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरते (Gardening Tips). पण बाजारात प्रत्येक वेळी ताजा कडीपत्ता मिळेलच असे नाही.

घरातला कडीपत्ता संपला असेल तर, बाजारात जाण्यापेक्षा आपण घरातच कडीपत्त्याचे झाड लावू शकता. पण घरात हवी तशी कडीपत्त्याची वाढ होत नाही. ज्यामुळे घरात कडीपत्त्याचे झाड लावावं की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. जर आपल्याला घरातल्या कुंडीत कडीपत्त्याचे रोप लावायचं असेल तर, ३ टिप्स फॉलो करा. रोप बहरेल(Growing Curry Leaves - Caring For Curry Leaf Plants).

ऋतूनुसार कुंडीतल्या मातीत खत मिसळा

खत हे एक प्रकारचे उत्पादन रसायन आहे, जे झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते. पण अनेकदा माहितीच्या अभावामुळे, कडीपत्त्याच्या झाडाला आपण एकच प्रकारचे खत घालतो. यामुळे रोपाची वाढ होत नाही. बदलत्या ऋतूनुसार रोपाला लागणारे खत आणि पाणी देण्याची वेळ बदलायला हवी. आपण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात झाडावर खताचे वापर करू शकता. पण हिवाळ्यात झाडाला खत घालू नये. या काळात मातीत खत मिसळल्यास, पानं पिवळी पडू शकतात.

आम तो आम…. आंब्याची सालही खास! करा 'असा' वापर; बागेतलं एकेक झाड फुलाफळांनी बहरेल

कडीपत्त्याचे झाड सुकल्यावर काय करावे?

जर आपल्या घरात कडीपत्त्याचे झाड उंच वाढले असेल, आणि सुकले असेल तर घाबरू नका. कडीपत्त्याच्या हिरव्यागार पानांसोबत फुलं वाढली असले तर, वेळीच छाटून काढा. फुलांमुळे कडीपत्त्याची वाढ थांबते. ज्यामुळे झाडे सुकायला लागतात. म्हणून, वेळीच पिवळी पानं आणि फुलं छाटायला हवी.

तांदळाचे तयार करा खत

लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा १ खत; झाड वाढेल भरभर - रसाळ लिंबांनी लगडेल झाड

बाजारात उपलब्ध असलेल्या खतामुळे कढीपत्त्याची रोप वाळते. त्यामुळे विकतच्या खताचा वापर करण्यापेक्षा आपण घरातच तांदुळाच्या वापराने खत तयार करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये कच्चे तांदूळ क्रश करून घ्या. त्यात पाणी घाला. २ तासानंतर पाणी गाळून एका बॉटलमध्ये भरून ठेवा. आठवड्यातून एकदा या पाण्याचा वापर खत म्हणून झाडांवर करा. या नैसर्गिक खतामुळे कडीपत्त्याच्या रोपाची हिरवीगार वाढ होईल.

Web Title: Growing Curry Leaves - Caring For Curry Leaf Plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.