lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > गुलाबाला येतील भरपूर फुलं, फक्त ऑक्टोबर महिन्यात न विसरता गुलाबाच्या झाडासाठी ‘एवढं’ कराच..

गुलाबाला येतील भरपूर फुलं, फक्त ऑक्टोबर महिन्यात न विसरता गुलाबाच्या झाडासाठी ‘एवढं’ कराच..

How to Take Care of Rose Plant For Getting More Flower: यंदाच्या सिझनमध्ये गुलाबाला भरभरून फुलं यावी असं वाटत असेल तर ऑक्टोबर महिन्यात गुलाबाच्या झाडासाठी या ४ गोष्टी कराच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2022 05:14 PM2022-10-07T17:14:10+5:302022-10-07T17:15:34+5:30

How to Take Care of Rose Plant For Getting More Flower: यंदाच्या सिझनमध्ये गुलाबाला भरभरून फुलं यावी असं वाटत असेल तर ऑक्टोबर महिन्यात गुलाबाच्या झाडासाठी या ४ गोष्टी कराच...

Gardening Tips: Rose plant not getting enough flower? Must do these 4 things in October | गुलाबाला येतील भरपूर फुलं, फक्त ऑक्टोबर महिन्यात न विसरता गुलाबाच्या झाडासाठी ‘एवढं’ कराच..

गुलाबाला येतील भरपूर फुलं, फक्त ऑक्टोबर महिन्यात न विसरता गुलाबाच्या झाडासाठी ‘एवढं’ कराच..

Highlightsअख्खा सिझन निघून जातो, तरी आपल्या गुलाबाला फुलं येतच नाहीत. आली तरी त्यांची चांगली वाढ होत नाही. झाडावर किड पडते, पाने गळून जातात.

अंगणात मोजून ४- ५ कुंड्या असल्या तरी त्यातला एखादा गुलाब (Rose plant) असतोच. कारण गुलाबाचं फुल अनेकांच्या खास आवडीचं असतं. या फुलाचा टवटवीत मोहकपणा बघूनच फ्रेश वाटतं. पण बऱ्याचदा आपण त्याच्याकडे लक्ष देण्यात कमी पडतो. म्हणून मग अख्खा सिझन निघून जातो, तरी आपल्या गुलाबाला फुलं येतच नाहीत. आली तरी त्यांची चांगली वाढ होत नाही. झाडावर किड पडते, पाने गळून जातात. आपल्या गुलाबाच्या रोपट्यासोबत असं काहीही होऊ नये आणि हंगामात गुलाब फुलांनी अगदी बहरून जावा, यासाठी ४ गोष्टी या ऑक्टोबर (Must do these 4 things in October for your rose plant) महिन्यात हमखास कराच.

 

ऑक्टोबर महिन्यात कशी घ्यावी गुलाबाची काळजी
१. झाडांची कटींग

गुलाबाच्या झाडाची कटींग करण्यासाठी ऑक्टोबर महिना अगदी उत्तम आहे. या महिन्यात गुलाबाची सॉफ्ट कटींग किंवा प्रुनिंग करा. म्हणजे फक्त वरवरची पानं आणि फांद्यांचा वरचा टोकाचा काही भाग कापा. कटिंग करताना जरा टोकदार कात्री वापरा म्हणजे कापलेले टोक अधिक डिस्टर्ब न होता, पुढची वाढ चांगली होईल.

 

२. माती वर खाली करा
या सिझनमध्ये गुलाबाच्या झाडाची माती एकदा खाली- वर केली की ते झाडाच्या वाढीसाठी अधिक चांगले ठरते. यासाठी कुंडीच्या टोकाकडून सुरुवात करा. मधल्या भागात रोपट्याच्या जवळपास असणारी माती तशीच राहू द्या. झाडाची छोटी छोटी मुळं दिसेपर्यंत आजूबाजूची माती शक्य तेवढी काढून घ्या. जमिनीवर पसरवून ठेवा. यामुळे माती चांगली वाळेल. मातीत काही किड असेल, तर ती निघून जाईल. यानंतर पुन्हा माती कुंडीत भरून टाका. 

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात पुऱ्या टम्म फुगाव्या म्हणून ४ टिप्स, गोलगरीत पुऱ्या करा मस्त

३. झाडाला खत द्या
माती जेव्हा पुन्हा कुंडीत भराल तेव्हा अर्ध्यापेक्षा अधिक माती भरली की एखादे खत त्या मातीवर टाका. कुंडीच्या कडेकडेने खत टाका. खोडाच्या किंवा मुळांच्या अगदी जवळ खत टाकू नये. खताचा एक थर पसरवून टाकला की पुन्हा वरतून उरलेली माती टाकून द्या.

 

४. कुंडीत थोडी जागा ठेवा
कुंडीत माती भरताना अगदी काठोकाठ भरू नका. थोडी जागा रिकामी ठेवा. यामुळे झाडाला जेव्हा तुम्ही पाणी द्याल तेव्हा ते वाहून न जाता मातीत व्यवस्थित मुरेल.


 

Web Title: Gardening Tips: Rose plant not getting enough flower? Must do these 4 things in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.