Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुळशीच्या रोपावर मुंग्यांचं - मुंग्या ? आजीच्या बटव्यातील 'ही' छोटीशी ट्रिक आणि उन्हाळ्यातही तुळस राहील टवटवीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2026 11:07 IST

easy home remedies to remove ants from tulsi plant pot : how to protect tulsi plant from ants : how to remove ants from tulsi pot : तुळशीच्या रोपांवर मुंग्या फिरतात ? किचनमधील २ पदार्थ करतील मुंग्यांचा बंदोबस्त आणि तुळस हिरवीगार...

आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाच्याच घरात तुळशीचं रोप असतं. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळशीला आपल्याकडे खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे अनेक जण तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घेतात. वेळेवर पाणी घालणे, योग्य प्रमाणांत ऊन मिळेल अशा ठिकाणी रोप ठेवणे अशा अनेक गोष्टी केल्या जातात. आपण या तुळशीच्या रोपाची खूप काळजी घेतो, वेळेवर पाणी घालतो, खत देतो; तरीही अनेकदा एक मोठी समस्या सतावते, ती म्हणजे 'मुंग्या'. इतकी काळजी घेऊनही अनेकदा तुळशीच्या कुंडीत मुंग्या दिसू लागल्या की अगदी हिरमोडच होतो. तुळशीच्या कुंडीत किंवा रोपावर मुंग्या झाल्या की हळूहळू त्या मुळांना पोखरू लागतात, ज्यामुळे रोप वाळू लागते. जेव्हा आपण पाहतो की, आपण जीवापाड जपलेल्या याच तुळशीच्या रोपाला मुंग्यांनी वेढलं आहे आणि ती हळूहळू सुकू लागली आहे, तेव्हा मन खूप कासावीस होतं(easy home remedies to remove ants from tulsi plant pot).

तुळशीचं रोप लावताना आपण खूप उत्साहात असतो, पण काही दिवसांतच कुंडीत लाल-काळ्या मुंग्यांचा सुळसुळाट सुरू होतो आणि हिरवीगार दिसणारी तुळस अचानक कोमेजायला लागते. अनेकदा आपण पाणी किंवा खत बदलून बघतो, पण मुंग्या काही केल्या कमी होत नाहीत. या मुंग्या केवळ मातीत नसून त्या तुळशीच्या मुळांना आतून पोखरत असतात. जर वेळीच उपाय केला नाही, तर तुमचं बहरलेलं रोप कायमचं वाळू शकतं. पण काळजी करू नका! काही साध्या सोप्या घरगुती उपायाने (how to protect tulsi plant from ants) एका रात्रीत तुळशीच्या रोपाला लागलेल्या मुंग्या (how to remove ants from tulsi pot) गायब होतील आणि तुळस पुन्हा पूर्वीसारखीच डोलू लागेल... 

सर्वात आधी तुळशीची 'मंजिरी' काढून टाका... 

उन्हाळ्याच्या दिवसांत तुळशीच्या रोपाला मोठ्या प्रमाणात मंजिरी, म्हणजेच फुले आणि बिया येऊ लागतात. अनेकदा आपण या मंजिरी तशाच राहू देतो, पण हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. जेव्हा रोपावर मंजिरी येते, तेव्हा रोपाची सर्व शक्ती आणि ऊर्जा ही बी तयार करण्यासाठी खर्च होऊ लागते. परिणामी, रोपाची वाढ खुंटते आणि त्याला नवीन पाने येणे कमी होते. त्यामुळे, वेळोवेळी ही मंजिरी हाताने किंवा कात्रीने कापून टाकणे फायद्याचे ठरते. असे केल्याने रोपाला नवीन फुटवा फुटतो, तुळस अधिक डेरेदार होते आणि नवीन पाने वेगाने येऊ लागतात तसेच तुळशीच्या रोपाची वाढ अधिक चांगली आणि वेगाने होते. 

ऐन चाळिशीतही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, नकळत होणाऱ्या ५ चुका आजच बदला-नाहीतर वेळ निघून जायची...

तुळशीच्या कुंडीत मुंग्या का येतात?

अनेकदा तुळशीच्या कुंडीतील मातीमधील ओलावा, गोडवा किंवा लहान कीटक (जसे की मिलीबग्स) यांच्यामुळे मुंग्या आकर्षित होतात. या मुंग्या दिसायला साध्या वाटल्या तरी त्या हळूहळू रोपाच्या मुळांना पोखरून काढतात आणि नुकसान पोहोचवू शकतात. मुंग्यांच्या वावरामुळे अनेकदा मातीच्या आत बुरशी (Fungus) तयार होऊ लागते, ज्यामुळे रोपाला मिळणारे पोषण थांबते आणि रोप कमकुवत होते. जर वेळीच या मुंग्यांचा बंदोबस्त केला नाही, तर तुमची हिरवीगार तुळस पूर्णपणे सुकू शकते.

तुळशीच्या रोपाला मुंग्या लागल्या तर घरगुती उपाय काय ? 

१. आल्याच्या सालीची पावडर किंवा सुंठ पावडर वापरा :- तुळशीच्या रोपाला मुंग्यांपासून वाचवण्यासाठी तुम्ही आल्याच्या पावडरचा (Ginger Powder) वापर करू शकता. हा एक अतिशय सोपा आणि फायदेशीर घरगुती उपाय आहे. एक ग्लास पाणी घ्या. त्यात अर्धा चमचा वाळलेल्या आल्याच्या सालीची पावडर किंवा सुंठ पावडर मिसळा. हे मिश्रण नीट ढवळून घ्या आणि हे पाणी तुळशीच्या कुंडीत टाका. या उपायामुळे केवळ मुंग्याच दूर पळत नाहीत, तर रोपाच्या मुळांना मजबुती मिळण्यासही मदत होते. आल्याचा उग्र वास मुंग्यांना सहन होत नाही, त्यामुळे त्या रोपापासून लांब राहतात.

घरभर प्रत्येक कोपऱ्यात काळ्या मुंग्यांची रांग? चटकन स्वयंपाकघरातील ५ पदार्थ ‘असे’ वापरा, मुंग्या गायब...

२. हळद :- तुळशीच्या रोपातील मुंग्या घालवण्यासाठी हळद हा एक सर्वोत्तम घरगुती उपाय मानला जातो. हळदीमध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे कुंडीतील माती सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. सर्वात आधी कुंडीतील माती थोडी ओली करून घ्या. त्यानंतर मातीवर आणि रोपाच्या मुळांच्या आजूबाजूला एक चमचा हळद पावडर शिंपडा. हळद टाकल्यानंतर त्या दिवशी रोपाला पाणी देऊ नका. हळदीच्या तीव्र वासामुळे आणि औषधी गुणधर्मांमुळे मुंग्या लगेच दूर पळू लागतात. तसेच मातीतील बुरशी आणि लहान कीटकांची समस्या देखील या उपायामुळे कमी होते.

उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाची काळजी कशी घ्यावी?

१. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तुळशीचे रोप लवकर सुकू शकते. त्यामुळे या ऋतूत रोपाची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात तुळस लवकर सुकते, म्हणून अनेकदा आपण त्यात जास्त पाणी घालतो. पण लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त पाणी घातल्यास मुळं सडू शकतात. मातीचा ओलावा तपासून आवश्यक तेवढेच पाणी द्यावे. 

२. दुपारच्या कडक उन्हात तुळशीला पाणी घालणे टाळा, यामुळे रोप कमकुवत होऊ शकते. पाणी देण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळची वेळ सर्वात उत्तम मानली जाते.

३. तुळशीच्या रोपाला दररोज किमान ४ ते ५ तास ऊन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल, पण दुपारच्या अतिप्रखर उन्हापासून त्याचे संरक्षण होईल याचीही काळजी घ्या.

४. जर तुमच्या तुळशीला मुंग्या लागत असतील, तर हळद आणि आले (सुंठ) यांसारखे घरगुती उपाय वापरा. हे उपाय केवळ मुंग्यांनाच दूर ठेवत नाहीत, तर रोपाची वाढ सुधारण्यासही मदत करतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Ants on Tulsi? Grandma's trick for a thriving plant!

Web Summary : Protect your Tulsi plant from ants with simple home remedies like ginger and turmeric. Remove flower buds to encourage growth, ensure proper sunlight and water, and keep your Tulsi healthy and vibrant all summer long.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीहोम रेमेडी