Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाब, मोगरा असो की जास्वंद... १५ दिवसांत रोपाला येतील भरपूर कळ्या, घ्या सोपा घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 11:17 IST

Best Home Made Fertilizer For Flowering Plants: गुलाब, मोगरा, जास्वंद अशा फुलझाडांना कळ्याच येत नसतील तर पुढे सांगितलेला एक अतिशय सोपा उपाय करून बघा.(how to get maximum flowers from plants?)

ठळक मुद्देअगदी पंधरा दिवसांतच रोपाला छान कळ्या आलेल्या दिसतील. महिन्यातून एकदा किंवा दोनदाच हा उपाय करावा. 

गार्डनिंगची आवड असणारे बहुतांश लोक आपल्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये आवर्जून काही फुलझाडांची रोपं लावत असतात. त्यामध्येही जास्वंद, गुलाब, मोगरा, मधुकामिनी, ऑफिस टाईम, चिनी गुलाब अशी रोपं लावली जातात. पण नंतर मात्र असा अनुभव येतो की फुलझाडांची ना चांगली वाढ होते, ना त्यांना फुलं, कळ्या येतात. असं होण्याचं कारण म्हणजे नुसतं पाणी घालून त्यांना पुरेसं पोषण मिळत नाही. म्हणूनच पाण्यासोबतच तुमच्या स्वयंपाक घरातले दोन पदार्थही त्या रोपांना द्या (best home made fertilizer for flowering plants). जेणेकरून त्यांना छान पोषण मिळेल आणि भरभरून वाढ होत त्यांना कळ्याही भरपूर येतील.(how to get maximum flowers from plants?)

 

फुलझाडांसाठी उत्तम ठरणारे घरगुती खत

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एप्सम सॉल्ट आणि कॉफी पावडर लागणार आहे. एका भांड्यामध्ये २ चमचे एप्सम सॉल्ट आणि १ ते दीड चमचा कॉफी पावडर एकत्र करा.

एखादं गाणं ऐकल्यावर का आपण दिवसभर तेच गुणगुणतो? बघा आपल्या डोक्यात कोणता किडा वळवळत असतो...

यानंतर एका भांड्यात साधारणपणे अर्धा लीटर पाणी घ्या. अर्धा लिटर पाण्यात आपण तयार केलेल्या मिश्रणाचे दोन चमचे घाला. या प्रमाणानुसार तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पाणी तयार करून घेऊ शकता. 

 

आता हे अर्धा लीटर पाणी तुम्ही दोन रोपांना देऊ शकता. उन्हाळ्याचे दिवस असतील तर संध्याकाळच्या वेळी आणि हिवाळ्याचे दिवस असतील तर सकाळच्या वेळी हे खत रोपांना द्या. 

बराच वेळ बसून उठल्यानंतर तळपाय खूप दुखतात? सेलिब्रिटी ट्रेनर अंशुका परवानी सांगतात ३ सोपे व्यायाम

पाण्यात मिसळून घालायचं नसेल तर हे खत रोपांना देण्याची दुसरी पद्धत म्हणजे रोपाच्या आसपासची माती थोडीशी उकरून घ्या. आणि नंतर मातीमध्ये हे खत भुरभुरून टाका. पण पाण्यामध्ये मिसळून हे खत जर रोपांना दिलं तर त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. अगदी पंधरा दिवसांतच रोपाला छान कळ्या आलेल्या दिसतील. महिन्यातून एकदा किंवा दोनदाच हा उपाय करावा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Get abundant buds in 15 days: Easy homemade fertilizer for plants.

Web Summary : Boost flowering plants like roses and jasmine with a simple homemade fertilizer. Mix Epsom salt and coffee powder in water, applying it to plants every two weeks for abundant buds within 15 days.
टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणीफुलंखते