Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताज्या हिरव्यागार कोथिंबीरीचा करा झणझणीत चटका, पहिला घास खाताच म्हणाल वाह क्या बात है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2026 19:02 IST

Zesty Green Coriander Chutney – A Burst of Flavor in Every Bite, must try recipe : करा कोथिंबीरीचा चटका झटपट. अगदी मस्त रेसिपी.

कोथिंबीर हा स्वयंपाकघरात नेहमी वापरला जाणारा पदार्थ आहे. बहुतेक वेळा ती फक्त सजावटीसाठी किंवा चवीपुरतीच वापरली जाते, पण कोथिंबीरीला स्वतःची वेगळी चव असते. त्यामुळे एकदा कोथिंबीरीचा चटका हा महाराष्ट्रातील खास पदार्थ नक्की करुन पाहा. हा आवडीने खाल्ला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. (Zesty Green Coriander Chutney – A Burst of Flavor in Every Bite, must try recipe )नावाप्रमाणेच हा पदार्थ चटाकेदार, झणझणीत आणि खमंग चवीचा असतो. कोथिंबीरीचा चटका हा साधारणपणे जेवणात भात, भाकरी किंवा पोळीबरोबर खाल्ला जाणारा पदार्थ आहे. ताजी कोथिंबीर, तिखट, लसूण आणि इतर मसाल्यांच्या चवीमुळे या पदार्थाला खास झणझणीतपणा येतो. त्यामुळे साध्या जेवणालाही वेगळी चव येते. सोबत कांदा आणि लोणचं असेल तर मजाच येईल. पाहा रेसिपी. 

साहित्य कोथिंबीर, तेल, जिरे, मोहरी, लसूण, हिंग, लाल तिखट, गूळ, मीठ, शेंगदाण्याचे कुट, पाणी

कृती१. छान ताजी कोथिंबीर घ्यायची. गावठी मिळाली तर अति उत्तम. कोथिंबीर निवडायची आणि बारीक चिरायची. दोन जुड्या तरी लागतातच कारण कोथिंबीर शिजल्यावर चोरटी होते. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. नंतर लसूण चिरुन घ्यायचा. बारीक चिरायचा. 

२. शेंगदाण्याचे कुट तयार करायचे. जाडसरच करा म्हणजे चव मस्त लागते. गुळाचे लहान तुकडे करायचे. गूळ जास्त घ्यायचा नाही. थोडाच घ्यायचा. अगदी चवीपुरताच. 

३. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे. तेल मस्त गरम झाले की त्यात चमचाभर जिरे घालायचे. तसेच मोहरी घालायची. जिरे फुलले आणि मोहरी तडतडली की त्यात लसूण घालायचा. लसूण मस्त परतून घ्यायचा. नंतर त्यात थोडी कोथिंबीर घालायची. जास्त नाही. जरा परतायची. त्यात चवीनुसार मीठ घालायचे. तसेच थोडा गूळ घालायचा. गूळ विरघळला की त्यात लाल तिखट घाला. मीठ घाला आणि हिंग घाला. परतून घ्या. चमचाभर पाणी घाला. 

४. मसाला छान तयार झाला की त्यात बाकीची कोथिंबीर घालायची. कोथिंबीर अगदी मस्त परतायची. परतली गेली की त्यात शेंगदाण्याचे कुट घालायचे. झाकण ठेवायचे आणि वाफ काढून घ्यायची. गरजेनुसार पाणी घालायचे. मात्र चटका पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची.    

English
हिंदी सारांश
Web Title : Spicy Coriander Chutney: A Flavorful Maharashtrian Delight, Easy to Make!

Web Summary : This Maharashtrian-style coriander chutney is a flavorful delight. Fresh coriander, chili powder, garlic, and spices create a zesty and tempting dish. Enjoy it with rice, bhakri, or roti for an enhanced meal. Add onion and pickle for extra taste.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स