Lokmat Sakhi >Food > तेल न वापरता १ वाटी रव्याचे करा इंस्टंट अप्पम; मऊ, जाळीदार अप्पम-चटणीचा बेत पटकन

तेल न वापरता १ वाटी रव्याचे करा इंस्टंट अप्पम; मऊ, जाळीदार अप्पम-चटणीचा बेत पटकन

Zero Oil Instant Rava Appam Recipe : कमी तेल, कमी मसाले वापरून तुम्ही घरच्याघरी हेल्दी तितकाच चविष्ट नाश्ता बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:52 IST2024-12-16T14:26:42+5:302024-12-16T15:52:53+5:30

Zero Oil Instant Rava Appam Recipe : कमी तेल, कमी मसाले वापरून तुम्ही घरच्याघरी हेल्दी तितकाच चविष्ट नाश्ता बनवू शकता.

Zero Oil Instant Rava Appam Recipe : Instant appam with 1 cup of semolina Rava Appam Recipe | तेल न वापरता १ वाटी रव्याचे करा इंस्टंट अप्पम; मऊ, जाळीदार अप्पम-चटणीचा बेत पटकन

तेल न वापरता १ वाटी रव्याचे करा इंस्टंट अप्पम; मऊ, जाळीदार अप्पम-चटणीचा बेत पटकन

सकाळी किंवा संध्याकाळी भूक लागल्यानंतर पटकन काय बनवून खाता येईल असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो. बाहेरचे  इंस्टंट नुडल्स हे पदार्थ ५ ते १० मिनिटांत तयार होतात पण त्यात पौष्टीक पदार्थ अजिबातच नसतात (Instant Recipe Of Rava Appam).  कमी तेल, कमी मसाले वापरून तुम्ही घरच्याघरी हेल्दी तितकाच चविष्ट नाश्ता बनवू शकता. (How To Make Appam Instantly)

हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागणार नाही.  साऊथ इंडियन पदार्थ नाश्त्याला आवर्जून खाल्ले जातात. अप्पम हा अनेकांच्या आवडीचा नाश्ता आहे. मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी तुम्ही अप्पम बनवू शकता. (How To Make Rava Appam)

अप्पम करण्याची सोपी पद्धत

मिक्सरच्या भांड्यात १ कप दही घाला, त्यात अर्धा चमचा साखर,अर्धा चमचा मीठ, ५० ग्रॅम दही, अर्धा कप पाणी घाला. हे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर पातळ पेस्ट तयार करून घ्या. यात १ चमचा फ्रुट सॉल्ट घालून चमच्यानं एकजीव करून घ्या. या उपायानं अप्पम अगदी सॉफ्ट, जाळीदार बनतील. हे बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असू नये.

एक फ्राईंग पॅन गरम करून घ्या. त्यात पाण्याचे थेंब शिंपडून स्वच्छ कापडानं पुसून घ्या. मग अर्धा कप गोलाकार अप्पमचं पीठ घाला. हे पीठ सेटल झाल्यानंतर थोडं थोडं शिजू लागेल नंतर जाळी यायला सुरूवात होईल, मग दुसऱ्या बाजूला फिरवून घ्या. अप्पम मंद आचेवरच शिजवा.

तुम्ही झाकण ठेवून किंवा ओपन पॅनमध्ये अप्पम बनवू शकता.५ ते १० मिनिटांत अप्पम बनून तयार होईल. ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला जराही तेल लागणार नाही. जर तुम्ही लोखंडाच्या तव्यावर अप्पम बनवत असाल तर काळजीपूर्वक करा.


 
अप्पमसोबत खायला चटणी कशी करावी?

सगळ्यात आधी एक वाटी शेंगदाणे भाजून त्यांची सालं काढून घ्या. १ वाटी भाजलेली चण्याची डाळ घ्या, २-३ हिरव्या मिरच्या, १ लिंबाचा रस, मीठ घालून हे सर्व साहित्य मिक्सर मधून फिरवून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी,जीरं, कढीपत्त्याची फोडणी तयार करून ही फोडणी तयार चटणीच्या मिश्रणावर घाला. तयार आहे इंस्टंट चटणी.

Web Title: Zero Oil Instant Rava Appam Recipe : Instant appam with 1 cup of semolina Rava Appam Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.