साबुदाण्याचे तेच तेच पदार्थ घरोघरी सतत केले जातात आणि आवडीने खाल्लेही जातात. पण कधीतरी काही वेगळे खायला हवेच. साबुदाण्याचे विविध पदार्थ करता येतात त्यापैकी एक म्हणजे हे बॉल्स. (You've never tried this nutritious steamed dish of sago and chickpeas? must try, tastes amazing... the recipe is easy)नाश्त्यासाठी साबुदाण्याचे छान असे वाफवून केलेले बॉल्स एकदा नक्की करा. अगदी सोपी रेसिपी आणि चटणी किंवा सॉससोबत एकदम छान लागेल.
साहित्य
साबुदाणा, तेल, मोहरी, कडीपत्ता, लाल तिखट, दाण्याचे कुट, नारळ, मीठ, तांदूळाचे पीठ, पाणी, चणाडाळ
कृती
१. साबुदाणा स्वच्छ धुवायचा. किमान चार तासासाठी भिजत ठेवायचा. व्यवस्थित भिजल्यावर फुगतो. मग त्यात दोन ते तीन चमचे तांदूळाचे पीठ घालायचे आणि हाताने मळायचे. साबुदाणा लगेच मिक्स होतो. पीठ म्हणजे लगदाच होतो. त्यात चिकटही होते. व्यवस्थित एकजीव करुन झाल्यावर त्यात मीठ घालायचे. मळायचे आणि मग हाताला तेल लावायचे आणि त्याचेल लहान गोळे तयार करायचे.
२. इडलीपात्रात किंवा कुकरमध्ये ते बॉल्स वाफवून घ्यायचे. छान वाफाळले की काढायचे आणि गार करायचे. गार झाल्यावर हाताने ते सोडवून घ्यायचे. वाफवताना ते एकमेकांना चिकटतात. पण लगेच वेगळेही होतात. वेगळे करुन घेतल्यावर एका कढईत किंवा पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल छान तापल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावर त्यात चणाडाळ घालायची. कडीपत्ता घालायचा. फोडणी मस्त तयार झाल्यावर त्यात तयार केलेले बॉल्स घालून परतायचे.
३. छान परतून घ्यायचे. खमंग आणि कुरकुरीत करायचे मग त्यात थोडे लाल तिखट घालायचे. तसेच थोडे दाण्याचे कुट घालायचे. खवलेला नारळ घालायचा आणि परतून घ्यायचे. नारळ नाही घातला तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार पदार्थ ठरवा. त्यात थोडे मीठ घालायचे आणि छान परतायचे. जरा चिकटच राहतात. अगदी खुसखुशीत होत नाहीत मात्र चव एकदम मस्त लागते.
