Join us
Daily Top 2Weekly Top 5

३ पैकी १ तरी गोष्ट रोज खा, तुमची त्वचा दिसेल तरुण-मऊ आणि फ्रेश, विसरा पार्लर आणि महागड्या क्रिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 13:42 IST

Your skin will look young, soft and fresh, forget parlors and expensive creams just eat these foods : आहारात हे पदार्थ असतील तर त्वचा राहील सुंदर.

त्वचा स्वच्छ, नितळ आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसण्यासाठी केवळ बाहेरून क्रीम किंवा फेसवॉश वापरणं पुरेसं नसतं, तर आतून योग्य आहार घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. आपण जे खातो त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. (Your skin will look young, soft and fresh, forget parlors and expensive creams just eat these foods )म्हणूनच रोजच्या आहारात काही विशिष्ट पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

पपई हे असं फळ आहे ज्यामध्ये एन्झाइम्स आणि व्हिटामिन ए मुबलक प्रमाणात असतात. हे घटक त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देतात. त्याचप्रमाणे अॅवोकाडोमध्ये हेल्दी फॅट्स आणि व्हिटामिन इ असतात, जे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतात आणि कोरडेपणा कमी करतात.

दही हा त्वचेसाठी खूप फायदेशीर पदार्थ मानला जातो. त्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि चांगलं पचन म्हणजे स्वच्छ त्वचा. अक्रोड आणि बदाम यांसारख्या ड्रायफ्रूट्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. ब्रोकोली त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे कारण त्यात व्हिटामिन सी आणि फायबर भरपूर असतं. हे घटक त्वचेची दुरुस्ती करतात आणि टवटवीत ठेवतात. टोमॅटोमध्ये लायकोपीन असतो, जो सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करतो.

बेरीज (जसे स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी) या अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. हळद ही नैसर्गिक अँटीसेप्टिक असल्यामुळे त्वचेवरील सूज आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करते. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती त्वचेला हायड्रेटेड ठेवते. किवी आणि संत्रं यांसारख्या फळांमध्ये व्हिटामिन सी मुबलक असतं, जे कोलेजन तयार करण्यास मदत करतं आणि त्वचेला तरुण ठेवतं. गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन असतं, जे त्वचेला आतून पोषण देतं आणि रंग उजळवण्यास मदत करतं. या सर्व पदार्थांचा संतुलित आहारात समावेश केल्यास त्वचा केवळ स्वच्छच नाही तर निरोगी आणि चमकदारही राहते.

सौंदर्य फक्त ब्यूटी प्रॉडक्ट वापरुन नाही किंवा स्किन केअर करुन नाही तर योग्य आहारातूनही मिळता येतं. जर  आहारात चांगला नसेल गरजेचे पोषण मिळत नसेल तर मग चांगले प्रॉडक्ट वापरुन किंवा बाह्य त्वचेची काळजी घेऊन काही फायदा होत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Eat one of these daily for youthful, glowing skin naturally.

Web Summary : Nourishing your skin from within is vital. Papaya, avocado, yogurt, nuts, broccoli, tomatoes, berries, turmeric, cucumber, kiwi, oranges, and carrots promote healthy, radiant skin, reducing reliance on external products.
टॅग्स :ब्यूटी टिप्सअन्नफळेत्वचेची काळजीकिचन टिप्स