मराठवाडा हा झणझणीत पदार्थ आवडणाऱ्या खवय्यांचा प्रांत. या भागात थोडे तिखट पदार्थ जास्त आवडीने खाल्ले जातात. आता सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे मराठवाड्यात एक पारंपरिक पदार्थ गाजत आहे आणि तो म्हणजे येसर. येसर आमटी आणि मेतकूट हे दोन पदार्थ मराठवाड्यात लग्नघरी हमखास केले जातात आणि लग्नात चिवडा- लाडूसोबत थोडा येसर मसाला आणि मेतकूटही वऱ्हाडी मंडळींना वाटले जातात. यास येसरची रेसिपी आता आपण पाहूया.. या येसर मसाल्याची खासियत अशी की तुम्ही या मसाल्याची नुसती आमटी करूनही खाऊ शकता (Marathwada special yesar amti recipe) किंवा मग वांगं, शेवगा यासारख्या इतर भाज्यांना ग्रेव्ही म्हणूनही येसर वापरू शकता (yesar masala recipe). येसरला काही भागात येसूर असंही म्हणतात. तेच येसर आता कसं करायचं ते पाहूया..(how to make yesar amti)
येसर मसाला रेसिपी
साहित्य
१ वाटी बाजरी
अर्धी वाटी हरबरा डाळ
तांदूळ आणि धणे प्रत्येकी २ चमचे
नाकावरचे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स ५ मिनिटांत हाेतील गायब, लगेच करा १ सोपा घरगुती उपाय
गहू आाणि जिरे प्रत्येकी १ चमचा
दालचिनीचा एक ते दिड इंचाचा तुकडा
२ ते ३ तेजपत्ता
१० ते १२ मिरे आणि ८ ते १० लवंग
कृती
गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये मसाल्याचे एकेक पदार्थ टाकून मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
मसाल्याचे पदार्थ भाजून झाल्यानंतर डाळ, तांदूळ, गहू, बाजरी असे धान्य मंद आचेवर भाजून घ्या. गॅस अजिबात मोठा करू नये, अन्यथा मसाले जळतात आणि आमटीला उग्र वास येतो.
हिवाळा स्पेशल इंस्टंट लोणची! ५ मिनिटांत तयार होणारी ५ चटकदार लोणची, जेवणात येईल चव
भाजून घेतलेलं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या. येसर झालं तयार. हे येसर घट्ट झाकण असणाऱ्या डब्यात भरून ठेवलं आणि त्याला ओलसर हात लावला नाही तर ते महिनाभर चांगलं टिकतं.
