दही वडा , दही भल्ले असे पदार्थ फार लोकप्रिय आहेत. त्याची चव एकदम मस्त असते आणि करायची रेसिपीही सोपीच असते. या रेसिपी तसे पाहीले तर पौष्टिकच आहेत. फक्त एकच गडबड आहे ते म्हणजे त्यातील वडे भरपूर तेलात तळलेले असतात. (Would you like to eat a nutritious dahi vada? It is suitable for diet as well, it does not cause bloating..it tastes great..)बाकी मूगडाळ दही आणि चटणी सारेच आरोग्यासाठी चांगले पदार्थ आहेत. दही वड्याची ही एक पद्धत मात्र त्याला पौष्टिक स्वरुप देते. करायला अजिबात जास्त कष्ट लागत नाहीत. पाहा कसे कराल चविष्ट दही वडे.
साहित्य मूगडाळ, इनो, पाणी, मीठ, लाल तिखट, दही, डाळिंब, शेव, हिरवी मिरची, पुदिना, आलं, चिंच, चाट मसाला, मिरी पूड, कोथिंबीर
कृती१. मूगडाळ किमान तीन तासांसाठी भिजवायची. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ घ्यायची. त्यात थोडी हिरवी मिरची घालायची. मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट तयार करायची. जास्त पातळ नको अगदी थोडे पाणी घालायचे. छान एकजीव वाटून घ्यायची. भांड्यात काढून घ्यायचे आणि त्यात थोडे मीठ आणि इनो घालून मिक्स करायचे. नीट ढवळून घ्यायचे.
२. डाळिंब्याचे दाणे सोलून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे थोडा स्वच्छ धुतलेला पुदिना आणि आल्याचा तुकडा तसेच भिजवलेली चिंच एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. थोडी कोथिंबीरही त्यात घाला आणि वाटून त्याची चटणी तयार करा. छान घट्टसर चटणी तयार करायची. जास्त पातळ नको.
३. एका इडली पात्राला थोडे तेल लावायचे. तयार केलेले मिश्रण लावायचे अगदी इडलीसाठी भरता तेवढे पीठ भरु नका. लहान आकाराचे वडेच तयार करा. म्हणजे मऊ होतील, वाफवून घ्यायचे. किमान २५ ते ३० मिनिटे वाफवा. नंतर एका ताटलीत काढून घ्यायचे. दही फेटायचे. दही वड्यावर ओतायचे. त्यावर हिरवी चटणी लावायची. डाळिंब्याचे दाणे आणि चाट मसाला घालायचा. तसेच मिरी पूड घालायची. शेव घालायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.
Web Summary : Enjoy guilt-free Dahi Vada! This recipe uses steamed vada instead of fried, making it healthy and easy to digest. Moong dal, yogurt, and chutney create a delicious and nutritious dish. Garnish with pomegranate, sev, and coriander for added flavor.
Web Summary : दोष-मुक्त दही वड़ा का आनंद लें! यह रेसिपी तले हुए वड़े के बजाय उबले हुए वड़े का उपयोग करती है, जिससे यह स्वस्थ और पचाने में आसान हो जाता है। मूंग दाल, दही और चटनी एक स्वादिष्ट और पौष्टिक व्यंजन बनाते हैं। अनार, सेव और धनिया से गार्निश करें।