साहित्य
मखाणे, बदाम, वेलची, खसखस, खारीक, चणे, खडीसाखर, हळद, बडीशेप
प्रमाण
मखाणे दोन वाटी घेतले तर महिनाभर पूरेल एवढी पूड तयार करता येते. दोन वाटी मखाणे या अंदाजाने इतर प्रमाण घेताना वाटीभर बदाम घ्यायचे. (women health, Calcium decreases with age - special calcium-enhancing powder for women, just one teaspoon daily try it)दोन वाटी चणे घ्यायचे. दोन चमचे खसखस घ्यायची. सात ते आठ वेलची घ्यायच्या. पाच ते सहा चमचे बडीशेप घ्यायची. खडीसाखरेचा एक अख्खा दगड घ्यायचा. तुम्हाला गोड जसे आवडते त्यानुसार खडीसाखरेचे
प्रमाण ठरवा. दहा खारीक घ्यायच्या. दोन ते तीन चमचे हळद घ्यायची.
कृती
१. एका कढईमध्ये दोन वाटीभर मखाणे घ्यायचे. छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे. परतून झाल्यावर गार करत ठेवायचे. त्याच कढईत बदाम घ्यायचे आणि बदाम परतायचे. त्यात वेलची घालायची. वेलची परतायची. मग खसखस घालायची. चमचाभर खसखस छान परता आणि मग ते मिश्रणही ताटात काढून ठेवा. पिवळे चणे साला सकट घ्यायचे. चणे परतायचे. त्याचा रंग जरा बदलेपर्यंत परता. चणे वेगळे काढून ठेवायचे. ते ही गार होऊ द्यायचे. खारीक परतायची. दहा ते बारा खारीक परतायच्या आणि गार करायच्या.
२. एका मिक्सरच्या भांड्यात मखाणे घ्यायचे. मखाण्यांची सरसरीत पूड करायची. एका खोलगट पातेल्यात काढायची. त्याच मिक्सरच्या भांड्याच बदाम घ्यायचे. तसेच चणे घ्यायचे खसखस वाया जाणार नाही याची काळजी घेत सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात ओतायचे आणि सरसरीत छाव वाटायचे. मस्त सुकी पूड करायची. मखाणाच्या पूडमध्ये ओतायची.
३. मिक्सरच्या भांड्यात बडीशेप घ्यायची. खडीसाखर जरा खलबत्याने कुटायची. ते नसेल तर जड वस्तूने कुटायची. मग मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. खडीसाखर आणि बडीशेप मस्त वाटून घ्यायची. त्याची ही पूड करायची आणि मग तयार मिश्रणात ओतायची. सगळ्या पूड एकत्र करुन छान मिक्स करायच्या. एकजीव करुन घेतल्यावर त्यात दोन चमचे हळद घाला आणि हळदही मिक्स करा. हवाबंद डब्यात साठवून ठेवा. रोज चमचाभर पूड दुधात घालायची आणि ते दूध प्यायचे.