भारतीय आहारात तांदळाचे महत्व आहे. अनेकांचं भात खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. आहारात भाताचा समावेश करणं खूपच महत्वाचे आहे. आजकाल लोक घाईत असल्यमुळे भात व्यवस्थित शिजवत नाहीत. भात योग्य पद्धतीनं न शिजवल्यामुळे शरीराला अनेक प्रकारे नुकसान पोहोचू शकतं. पूर्वीच्या काळापासून भात शिजवण्याआधी पाण्यात भिजवण्याची पद्धत प्रचलित आहे. (What is the effect of soaking rice and cooking)
ज्यामुळे फक्त भाताची चव वाढत नाही तर आरोग्यालाही बरेच फायदे होतात. सध्याच्या काळात लोक तांदूळ धुवून या पाण्याचे सेवन करतात. या पाण्यात बरेच गुण लपलेले आहेत. तांदूळ भिजवल्यानं नेमकं काय होतं समजून घेऊ. (Why rice should be soaked before cooking)
तांदूळ पाण्यात भिजवल्यानं त्यातील फायटिक एसिड लेव्हल कमी होते. हे फायटिक एसिड शरीरातील आयर्न, कॅल्शियम आणि जिंक यांसारख्या खनिजांचे अवशोषण करणं रोखते. भिजवल्यामुळे शरीर आवश्यक खनिज सहज शोषून घेते. विशेषत: महिला आणि वयस्कर लोकांसाठी हे फायदेशीर ठरते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात, एनिमियापासून आराम मिळतो. याव्यतिरिक्त तांदूळ सहज पचण्यासही मदत होते. तांदूळ भिजवल्यामुळे अन्न शिजवण्याची प्रक्रिया उत्तम होते. पाण्यात भिजवलेले तांदूळ लवकर नरम पडतात. ज्यामुळे शिजवताना तांदूळ लवकर शिजतो आणि मोकळा होतो. चवही चांगली लागते.
तांदूळ भिजवताना या गोष्टींची काळजी घ्या
तांदूळ भिजवताना सावधगिरी बाळगायला हवी. तांदूळ जर तुम्ही दीर्घकाळ पाण्यात ठेवले तर त्यातील पोषक तत्व पाण्यात मिसळू शकतात. अर्धा तास ते २ तासांपर्यंत तांदूळ पाण्यात भिजवणं योग्य ठरतं. उन्हाळ्याच्या दिवसांतही जास्तवेळ तांदूळ पाण्यात भिवल्यानं तांदूळ लवकर शिजण्यास मदत होते.
भात पाण्यात भिजवण्याचे फायदे
तांदूळ भिजवलेला असेल तर आतपर्यंत ओलावा धरून ठेवतो ज्यामुळे भात बाहेरून मऊ आणि आतून कच्चा राहत नाही. तो सर्व बाजूंनी एकसारखा शिजतो.
तांदूळ जास्तवेळ शिजवावा लागला तर त्यातील पोषक तत्व नष्ट होण्याची शक्यता असते. भिजवल्यामुळे कमी वेळात शिजत असल्यानं पोषकता टिकून राहते.
तांदळात नैसर्गिकरित्या आढळणारे आर्सेनिकसारखे घातक घटक भिजवून पाणी काढून टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होतात.
