Foods to avoid in Monsoon : श्रावण महिन्याला लवकरच सुरूवात होणार आहे. (Shravan 2025). धार्मिक दृष्टीने या दिवसांना खूप महत्व असतं.श्रावणात अनेकजण उपवास करतात. एकदाच जेवतात. या साऱ्या रितींमागे हाच विचार की पावसात पोटाला जरा आराम आणि पचनशक्ती कमी असताना त्यावर ताण न येता हलका मोजका आहार घेणंच उत्तम.
वांगी
आपण कधीना कधी घरात वयोवृद्धांकडून ऐकलं असेल की, श्रावणात वांगी खायची नसतात. पण याचं कारण काय असतं? तेच पाहुया. तर पावसाळ्यात सगळीकडे ओलावा असतो. वांगी पचायला जड, वातूळ, पोट बिघडण्याचा धोका म्हणून खाऊ नयेत असं मानलं जातं.
दूध-दही?
या दिवसांमध्ये अनेकदा दूध, दही, खात नाहीत ते ही पचनाचे विकार, त्वचा विकार टाळायचे म्हणून. ज्यामुळे या गोष्टींमुळे गॅस, अॅसिडिटी, अपचन किंवा पचनासंबंधी इतरही समस्या होऊ शकतात.
उसळी कमी
पावसाळ्यात पचायला जड उसळीही कमी खाव्यात असे मानले जाते.
त्याचं कारणही तेच. ज्यांची पचनशक्ती कमी त्यांनी हे पदार्थ खाल्ल्यास ते बाधू शकतात.