तुम्हालाही ऑरेंज केक खायला आवडतो का? विकतचा खाण्यापेक्षा मग झटपट घरीच करा. घरच्या घरी केलेला ऑरेंज केक जास्त खास लागतो. कारण तो बाजारातल्या केकपेक्षा अधिक ताजा, हलका आणि ताज्या संत्र्याच्या ज्यूसचा केलेला असतो. (Why eat stale orange cake from the store? Make fresh, orange cake at home in 30 minutes)घरभर पसरलेला या केकचा सुगंध वातावरणच बदलून टाकतो. चहा किंवा कॉफीसोबत हा केक खाण्याची मजा काही औरच असते. ऑरेंज केकची खासियत म्हणजे तो फार जड नसतो तर मस्त हलका आणि सॉफ्ट लागतो. संत्र्यामुळे त्याला नैसर्गिक फ्रेशनेस येतो आणि त्यामुळे केक पटकन घट्टही होत नाही. गोड म्हणून किंवा पाहुण्यांसाठी काही खास करायचं असेल, तर ऑरेंज केक एक छान पर्याय ठरतो. पाहा कसा करायचा. सामग्रीही अगदी कमीच लागते.
साहित्य दूध, पिठीसाखर, बटर, संत्र, मैदा, बेकींग सोडा, व्हॅनिला इसेंस
कृती१. एका खोलगट भांड्यात पातळ केलेले बटर घ्यायचे. अर्धी वाटी बटर घ्या. त्यात वाटीभर पिठीसाखर घाला. तसेच अर्धी वाटी मैदा घाला. नंतर त्यात चमचाभर व्हॅनिला इसेंस घाला. संत्र्याचा ज्यूस घाला. जास्त नाही चार ते पाच चमचे घालायचा. मिश्रण मस्त फेटून घ्यायचे.
२. जरा मऊ झाले की त्यात वाटीभर दूध घालायचे. पुन्हा मस्त फेटायचे. फेटून जरा सैलसर घट्ट असे मिश्रण तयार करायचे. नंतर त्यात थोडा बेकींग सोडा घालायचा. (Why eat stale orange cake from the store? Make fresh, orange cake at home in 30 minutes)छान मिक्स करायचे. एका गोल वाटीला किंवा कोणत्याही भांड्याला थोडे बटर लावायचे. त्यात तयार केलेले मिश्रण ओतायचे.
३. ओव्हन असेल तर त्यात बेक करा. एकदम मऊ होतो. २० ते २५ मिनिटे बेक करायचा. ओव्हन नसेल तर एका पातेल्यात मीठाचा थर तयार करा. त्यात उलटी ताटली ठेवा आणि त्यावर केकचे भांडे ठेवा. झाका आणि ३० मिनिटे ठेवा. सुरीने तपासा की केक आत शिजला आहे की नाही. मस्त मऊ आणि चविष्ट होतो.
Web Summary : Enjoy homemade orange cake: fresher, lighter, and juicier than store-bought. This easy recipe uses simple ingredients like butter, sugar, orange juice, and baking soda. Bake in an oven or pot for a soft, delicious treat perfect with tea or coffee.
Web Summary : घर का बना ऑरेंज केक खाएं: स्टोर से बेहतर, हल्का और रसीला। इस आसान रेसिपी में बटर, चीनी, संतरे का रस और बेकिंग सोडा जैसी सामग्री का उपयोग करें। ओवन या बर्तन में बेक करें और चाय या कॉफी के साथ आनंद लें।