कॉफी प्रेमींसाठी सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. लोक आता साखर किंवा क्रीमऐवजी त्यांच्या कॉफीमध्ये चिमूटभर मीठ घालत आहेत. असं म्हटलं जातं की, यामुळे कॉफीचा कडूपणा कमी होतो आणि तिची चव वाढते. हा ट्रेंड अशा लोकांना आकर्षित करत आहे ज्यांना त्यांची कॉफी हेल्दी बनवायची आहे परंतु चवीशी तडजोड करायची नाही. सोशल मीडियावर प्रत्येकजण त्यांच्या कॉफीमध्ये मीठ का घालत आहे आणि या व्हायरल ट्रेंडमागील सायन्स काय आहे ते जाणून घेऊया...
कसा सुरू झाला ट्रेंड?
हा ट्रेंड सुरुवातीला कॉफीमध्ये चिमूटभर मीठ टाकल्याने त्याची चव वाढते या दाव्याने सुरू झाला. सुरुवातीला, लोकांना या ट्रेंडबद्दल शंका होती, परंतु एकदा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी ते वापरून पाहायला सुरुवात केली आहे. आता हा ट्रेंड जोरदार व्हायरल झाल्यानंतर लोक कॉफी पावडरमध्ये मीठ घालून किंवा तयार कॉफीमध्ये चिमूटभर मीठ घालून त्यावर प्रयोग करत आहेत.
सायन्स काय म्हणतं?
सायन्स एक्सपर्टच्या मते, मीठातील सोडियम कडूपणा कमी करतं आणि साखर न घालता कॉफीला गोड चव देतं. इतर एक्सपर्टचा असा सल्ला आहे की, कॉफीचा कडूपणा कमी करण्यासाठी चिमूटभर मीठ पुरेसे आहे, परंतु जास्त मीठ घालल्याने चव खराब होऊ शकते.
आरोग्य आणि खबरदारी
बऱ्याच लोकांच्या मते, मीठ हायड्रेशन वाढवतं, परंतु एक्सपर्ट असहमत आहेत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कॉफी किंचित डिहायड्रेटिंग असते आणि चिमूटभर मीठ घातल्याने काही फरक पडत नाही. जर तुम्ही साखर कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो चव वाढवण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. कॉफीमध्ये मीठ घालण्याचा ट्रेंड नवीन नाही. व्हिएतनाममधील कॅफेमध्ये मीठयुक्त कॉफी लोकप्रिय आहे, तर किनारी भागात पाण्यातील मिनरल बॅलन्स करण्यासाठी मीठ घालण्यात येतं. एक्सपर्टचं म्हणणं आहे की हा ट्रेंड केवळ सोशल मीडियावरची फॅशन नाही तर चव, सायन्स आणि पारंपारिक अनुभवाचं मिश्रण आहे.