Who Should Not Eat Radish : बरेच लोक असे असतात ज्यांना जेवणाच्या ताटात मुळा हवाच असतो. काही लोक आवडीने मूळ्याचे पराठे खातात, तर कुणी मूळ्याचं लोणचंही खातात. मूळ्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कारण मुळा खाल्ल्याने पचन तंत्र मजबूत राहतं आणि इम्यूनिटी सुद्धा मजबूत होते. पण मूळ्याचे फायदे सगळ्यांनाच होतात असं नाही. काही आजार असलेल्या लोकांसाठी मूळा खाणं नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे सगळ्यांसाठीच मुळा फायदेशीर ठरतो, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. अशात कोणत्या लोकांनी मुळा खाणं टाळला पाहिजे, हे आज आपण पाहणार आहोत.
ब्लड प्रेशर
ब्लड प्रेशर कमी असण्याची समस्या आजकाल भरपूर लोकांना असते. आपलंही ब्लड प्रेशर नेहमीच कमी राहत असेल तर मुळा आपल्यासाठी अडचण निर्माण करू शकतो. मूळ्यामध्ये पोटॅशिअम भरपूर असतं, जे शरीरातील सोडिअम कमी करून ब्लड प्रेशर घटवण्याचं काम करतं. हाय बीपी असणाऱ्यांसाठी तर मुळा खूप फायदेशीर असतो, पण ज्यांचा बीपी लो असतो, त्यांना याने चक्कर येणे किंवा कमजोरीची समस्या होऊ शकते.
थायरॉईड
थायरॉईड रुग्णांनी कच्चा मुळा खाणं टाळावे. मूळ्यात ‘गोइट्रोजेन’ नावाचे घटक असतात, जे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात अडथळा आणू शकतात. हे घटक शरीरात आयोडीनचं शोषण कमी करतात, त्यामुळे थायरॉईडची समस्या वाढू शकते. मुळा खायचाच असेल तर तो शिजवून खा; कच्चा मुळा टाळा.
डायबिटीस
मूळ्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत मिळते. पण जर तुम्ही आधीच डायबिटीसची औषधं घेत असाल आणि त्यासोबत जास्त प्रमाणात मुळा खाल्ला, तर साखर अचानक खूपच कमी होऊ शकते. ही अवस्था धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी मूळा मर्यादित प्रमाणातच खावा.
पोटात गॅस किंवा वेदना
मूळा पचायला थोडा वेळ लागतो आणि तो पोटात गॅस निर्माण करू शकतो. ज्यांना गॅस्ट्रायटिस, पोटातील अल्सर किंवा वारंवार गॅस होण्याची समस्या आहे, त्यांनी मुळा टाळावा. खासकरून रात्री मुळा खाल्ल्यास पोट फुगणे आणि वेदना वाढू शकतात.
पित्ताशयात स्टोन
ज्यांच्या पित्ताशयात स्टोन आहे, त्यांनी मूुळा खाणं टाळलं पाहिजे. काही संशोधनांनुसार मुळा खाल्ल्याने पित्ताचा स्राव वाढतो. पित्ताशयात स्टोन असताना हा वाढलेला स्राव वेदना अधिक तीव्र करू शकतो आणि त्रास वाढवू शकतो.
