Join us

अतिशय चांगलं असलं तरीही काही लोकांनी ताक पिणं घातक, पाहा कुणी ताक पिऊ नये..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:32 IST

Who Should avoid drinking Butter Milk : अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ताक पिणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात ताक कुणी पिऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Who Should avoid drinking Butter Milk : उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक शरीर थंड ठेवण्यासाठी आणि उष्माघातापासून बचाव करण्यासाठी रोज भरपूर ताक पितात. ताक पिण्याचे आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळतात. अनेक पोषक तत्व यातून शरीराला मिळतात. ताकामधून शरीराला कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मिनरल्स मिळतात. ताक पायल्यानं शरीरातील पाणी संतुलित राहतं. पण अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ताक पिणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात ताक कुणी पिऊ नये हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लॅक्टोज इन्टॉलरन्स

जर तुम्हाला लॅक्टोज इन्टॉलरन्सची समस्या असेल तर तुम्ही ताक पिणं टाळलं पाहिजे. कारण ताक हे दुधापासूनच तयार झालेलं असतं आणि लॅक्टोज इन्टॉलरन्सनं पीडित लोकांना दूध पचत नाही. अशात ताकातील लॅक्टोजमुळे पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.

एक्जिमा

जर तुम्हाला एक्जिमा असेल तर ताक पिणं टाळलं पाहिजे. ताकामधील अॅसिड आणि इतर तत्वांमुळे त्वचेसंबंधी समस्या वाढू शकतात. यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शते. सोबतच खाज आणि लाल चट्टेही त्वचेवर येऊ शकतात.

ताप

ताक थंड असतं, त्यामुळे जर तुम्हाला ताप असेल, सर्दी-खोकला किंवा पडसा असेल तर ताक पिणं टाळलं पाहिजे. तसेच घशात जर खवखव असेल तेव्हाही ताक पिणं टाळलं पाहिजे. 

किडनीची समस्या

जर तुम्हाला किडनीसंबंधी काही समस्या असेल तर चुकूनही ताक पिऊ नये. यातील पोटॅशिअम आणि फॉस्फोरसमुळे किडनीची समस्या आणखी जास्त वाढू शकते.

हृदयरोग असेल तर..

हृदयासंबंधी काही समस्या असेल तर ताक अजिबात पिऊ नये. यातील सॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्टेरॉलची लेव्हल बिघडू शकते. त्यामुळे ज्यांची कोलेस्टेरॉल लेव्हल आधीच वाढलेली असते तेव्हा ताक पिणं टाळलं पाहिजे.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य