भाकरी(Bhakri) करणं हे कौशल्य आहे पण योग्य तवा न निवडल्यास भाकरी व्यवस्थित जमत नाही. याऊलट परफेक्ट तवा निवडल्यास भाकरी तव्यावर न चिकटता मऊ, मुलायम होते. भाकीर चिकटू नये. पलटली जावी यासाठी बिडाचा तवा हा सर्वात उत्तम मानला जातो. बिडाचा तवा एकदा गरम झाला की तो उष्णता दीर्घकाळ टिकवून ठेवतो आणि ती उष्णता समान प्रमाणात वितरीत करतो. भाकरीला योग्य आणि स्थित उष्णता मिळाल्यानं ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली जाते आणि तुटत नाही. (Which pan should you use to make Bhakri)
बिडाचा तवा व्यवस्थित वळसवलेला असल्यास त्याला नैसर्गिकरित्या नॉन स्टिक गुणधर्म प्राप्त होतो. यामुळे भाकरी तव्याला चिकटत नाही. भाकरी न चिकटल्यामुळे सहज उटलता येते आणि तुटण्याची भिती कमी होते. बिडाचे तवे जाड असल्यामुळे भाकरी भाजताना त्यांना एक चांगला आधार मिळतो. भाकरी थापून झाल्यावर तव्यावर ठेवताना किंवा पलटवताना तिचा नाजूकपणा जपला जातो.
बिडाचे तवे अत्यंत टिकाऊ असतात आणि योग्य काळजी घेतल्यास ते पिढ्यानपिढ्या वापरले जाऊ शकतात. बिडाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यानं जेवणात लोहाचे प्रमाण वाढवण्यास मदत होते जे आरोग्यासाठी उत्तम ठरते.
बिडाचा तवा कसा वापरावा?
तवा गरम करून स्वच्छ धुवून घ्या. तवा पूर्णपणे कोरडा झाल्यावर त्याताल तेलाचा एक पातळ थर लावा.
तवा पुन्हा मध्यम आचेवर गरम करा. तेल जळून त्याचा रंग काळा किंवा गडद होत नाही तोपर्यंत गरम करा.
ही प्रक्रिया 2 ते 3 वेळा केल्यास तव्याला नॉन स्टिक गुणधर्म प्राप्त होतात आणि भाकरीसाठी तयार होतो.
एल्युमियमचा तवा हा हलका असतो आणि पटकन गरम होतो, पण उष्णता समान नसते, त्यामुळे भाकरी एका बाजूला करपू शकते आणि तुटण्याची शक्यता वाढते. भाकरीसाठी नॉन-स्टिक तवा वापरल्यास भाकरी चिकटणार नाही, पण भाकरीला पारंपरिक चव आणि पोत (Texture) मिळत नाही आणि नॉन-स्टिक कोटिंग उच्च उष्णतेला (High Heat) योग्य नसते. बिडाचा तवा भाकरी करण्यासाठी उत्तम ठरतो.
