निरोगी राहण्यासाठी स्वंयपाकासाठी तुम्ही कोणतं तेल वापरता हे खूपच महत्वाचं असतं. तुम्ही जे तेल खाता त्याचा सरळ परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. म्हणून कमी प्रमाणात आणि हेल्दी पर्याय असलेल्या तेलाचीच निवड करायला हवी. मार्केटमध्ये तुम्हाला २ प्रकारची तेलं मिळतात. एक कोल्ड प्रेस (cold pressed) ऑईल, एक हॉट प्रेस (hot pressed) ऑईल. (Which Is Best Oil For Cooking)
बरेच लोक कोल्ड प्रेस ऑईल जेवणात वापरतात इतर तेलांच्या तुलनेत हे तेल महाग असते. पण कोल्ड प्रेस तेल म्हणजे नक्की काय ते तयार करण्याची प्रक्रिया कशी असते. तसंच हॉट प्रेस ऑईल कसं करतात हे बऱ्याचजणांना माहिती नसते. कोल्ड प्रेस आणि हॉट प्रेस तेल काढण्याच्या २ टेक्निक्स आहेत. एकात हिटिंग पॉवरसोबत बिया क्रश करून तेल काढलं जातं तर दुसऱ्या पद्धतीत हिट न करतात वारंवार दाबून हलका दबाव देऊन प्रेस करून तेल काढलं जातं.
कोल्ड प्रेस तेल
हे तेल साधारण तेलाच्या तुलनेत महाग असते. कोल्ड प्रेस्ड प्रक्रियेत शेंगदाणे, ऑलिव्ह ऑईल, सोयाबीन,सुर्यपफुल, बदामाचे तेल, तिळाचे तेल तसंच इतर बियांचा वापर केला जातो. या प्रक्रियेत कमी तापमानात बीया वाटल्या जातात जोपर्यंत यातून तेल बाहेर येत नाही तोपर्यंत या बीया वाटल्या जातात.ज्यामुळे यातील पौष्टीक तत्व नष्ट होत नहीत. कोल्ड प्रेस तेलात साध्या तेलाच्या तुलनेत जास्त व्हिटामीन सी, ई, के, हेल्दी फॅट््स, एंटी ऑक्सिडेंट्स असतात. कोल्ड प्रेस्ड तेल म्हणूनच हेल्दी मानले जाते.
हॉट प्रेस तेल
हॉट प्रेस तेलात बीया उच्च तापमानात गरम करून त्यातून तेल काढलं जातं. यात बीया हायड्रॉलिक प्रेस करून दाबल्या जातात. नंतर हे तेल फिल्टर केले जाते. हॉट प्रेस ऑईलमध्ये लवकर तेल निघते. अनेकदा यातील पोषक तत्व जास्त गरम केल्यामुळे नष्ट होतात. कोल्ड प्रेस तेलाच्या तुलनेत हे तेल कमी पौष्टीक असते.
तब्येतीसाठी कोणतं तेल चांगलं?
आरोग्याच्या दृष्टीनं विचार केला जर कोल्ड प्रेस ऑईल जास्त चांगलं ठरतं कारण या तेलात व्हिटामीन्स, हेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असते. हॉट प्रेस ऑईल तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यातील पोषक घटक नष्ट होतात.हॉट प्रेस ऑईल रिफाईंन केले तर ते अजूनच खराब होते. म्हणून कोल्ड प्रेस ऑईलच खायला हवे ज्यामुळे शरीराला पुरेपूर फायदे मिळतील.
