Join us

मूग-मसुर की तूर-कोणत्या डाळीतून मिळतं जास्त प्रोटीन? शाकाहारी लोकांच्या आहारात रोज हवी ‘ही’ डाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:37 IST

Protein pulses : आपल्या रोजच्या आहारातील वेगवेगळ्या डाळींमधून आपल्याला भरपूर प्रोटीन मिळू शकतं. अशात कोणत्या डाळींमधून अधिक प्रोटीन मिळेल हे आज आपण पाहणार आहोत.

High Protein Rich Pulses : प्रोटीन शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे आपणा सगळ्यांना माहीत आहेच. पण प्रोटीनचा विषय आला तर लोकांना वाटतं की, केवळ मांसाहार करून प्रोटीन मिळवता येतं. मात्र, असं कही नाहीये. कारण मांसाहार न करताही प्रोटीन मिळवता येऊ शकतं. आपल्या रोजच्या आहारातील वेगवेगळ्या डाळींमधून (Protein pulses) आपल्याला भरपूर प्रोटीन मिळू शकतं. अशात कोणत्या डाळींमधून अधिक प्रोटीन मिळेल हे आज आपण पाहणार आहोत.

मसूरची डाळ (Masoor Dal /Lentils)

मसूरची डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. प्रोटीनसाठी मसूरची डाळ तुम्ही सालीसोबत किंवा सालीशिवायही खाऊ शकता. मसूरच्या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच फायबर, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी६, व्हिटामिन बी२, फोलिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम असे पोषक तत्वही भरपूर असतात.

तूर डाळ (Arhar / Pigeon Pea)

तूर डाळीमध्येही प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्याशिवाय या डाळीमध्ये फायबर फोलिक अ‍ॅसिड, आयर्न आणि कॅल्शिअमही भरपूर असतं. ही डाळ रोज खाल्ल्याने शरीरातील प्रोटीन वाढतं. तसेच तूर डाळीच्या सेवनाने डायबिटीस आणि हृदयरोग कंट्रोल करण्यासही मदत मिळते. इतकंच नाही तर तूर डाळीचं पाणी प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते.

चण्याची डाळ (Chana Dal / Bengal Gram Split)

चण्याची डाळ प्रोटीनने भरपूर असते. तसेच ही डाळ खाल्ल्याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. प्रोटीनसोबतच या डाळीमध्ये फायबरही भरपूर असतं, ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि पोटही साफ राहतं. इतकंच नाही तर चण्याच्या डाळीने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. तसेच या डाळीने शरीरात लाल रक्तपेशी वाढण्यासही मदत मिळते. 

मूग डाळ (Moong Dal / Green Gram Split)

तूर डाळीनंतर मूग डाळ ही सगळ्यात फायदेशीर मानली जाते. ही डाळ खाल्ल्याने  शरीराला प्रोटीन तर मिळतंच, सोबतच तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. मूग डाळी पचायला हलकी असल्याने पोटाच्या अनेक समस्याही दूर होतात. तसेच या डाळीने शरीरात ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं.

उडीद डाळ (Urad Dal / Black Gram)

उडीद डाळ अनेक दृष्टीने शरीरासाठी फायदेशीर मानली जाते. या डाळीमध्ये प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन बी सुद्धा भरपूर असतं. जर प्रोटीनची कमतरता दूर करायची असेल तर या डाळीचा रोजच्या आहारात समावेश करावा. तसेच या डाळीमध्ये फोलिक अ‍ॅसिड, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्वही भरपूर असतात. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र मजबूत राहतं.

शरीरात प्रोटीन कमी झालं (Protein Deficiency) तर त्याची अनेक लक्षणं दिसू शकतात. कारण प्रोटीन हे शरीराच्या स्नायू, हाडं, त्वचा, रक्त, हार्मोन्स आणि इम्युनिटीसाठी खूप आवश्यक आहे.

डाळीतील प्रोटीन (१०० ग्रॅम कच्च्या डाळीत)

मसूर डाळ - २५ ग्रॅम प्रोटीन

तूर डाळ - २२ ग्रॅम प्रोटीन

चण्याची डाळ - २१ ग्रॅम प्रोटीन

मूग डाळ - २४ ग्रॅम प्रोटीन

उडीद डाळ - २५ ग्रॅम प्रोटीन

प्रोटीन कमी झाल्याची मुख्य लक्षणं:

स्नायू कमजोर होणे

शरीर अशक्त वाटणे, स्नायूंमध्ये घट होणे

थकवा आणि कमजोरी

थोडं काम केल्यावरही थकवा जाणवणे

त्वचेचं आणि केसांचं नुकसान

केस गळणे, केस कोरडे पडणे, त्वचा कोरडी होणे, नखं तुटणे.

वारंवार आजारी पडणे

सर्दी, इंफेक्शन किंवा जखमा लवकर होणे आणि उशिरा बऱ्या होणे

भूक कमी-जास्त होणे

कधी खूप भूक लागणे तर कधी अजिबात न लागणे

पोट फुगल्यासारखं वाटणे

पाय आणि पोटाजवळ सूज येणे

मूडमध्ये सतत बदल

चिडचिड वाढणे, डिप्रेशन, एकाग्रता कमी होणे

लहान मुलांमध्ये वाढ थांबणे

प्रोटीन कमी असेल तर मुलांची उंची आणि वजन नीट वाढत नाही

हाडं कमजोर होणे

वारंवार वेदना होणे किंवा लवकर दुखापत होणे.

English
हिंदी सारांश
Web Title : High protein pulses: A guide for vegetarians to boost intake.

Web Summary : Pulses like lentils, pigeon pea, and Bengal gram are protein-rich options for vegetarians. They offer fiber, vitamins, and minerals, aiding digestion, controlling blood pressure, and boosting energy. Protein deficiency symptoms include fatigue, hair loss, and weakened immunity.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य