तेलाच्या (Cooking Oil) वापराबाबत बरेच लोक संभ्रमात असतात. कोणतं तेल तब्येतीसाठी चांगलं, कोणतं तेल वाईट याची खास काळजी घ्यायला हवी. फोडणीसाठी, तळण्यासाठी कशासाठी कोणतं तेल वापरायचं हे माहित असायला हवं. WHO आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन २०२३ नुसार फॅट म्हणजेच एमयुएफए, मोनोअनसॅच्युरेडेट फॅट्स हार्टसाठी चांगले मानले जातात. जसं की ऑलिव्ह ऑईल, शेंगदाण्याचे तेल, मोहोरीचं तेल असे बरेच पर्याय आहेत. (Which Oil Should Be Used For Cooking Vegetables Tadka And Deep Frying Oil List)
पॉलीअनसॅच्युरेडेट फॅट्स,ओमेगा-३, ओमेगा-६ देतात. जसं की सुर्यफुल, सोया किंवा मोहोरीचं तेल. आता सॅच्युरेडेट फॅट्सचं योग्य प्रमाणात सेवन करणं फायदेशीर ठरतं. वनस्पती तूप,डालडा, रिफाईंड ऑईल, स्ट्रोक, डायबिटीसची संबंधित आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार २०३० पर्यंत हे धोकादायक तेल संपूर्ण जगभरातून बॅन करायला हवेत.
भारतीय रिपोर्ट आयसीएमआर २०२१ नुसार ऑलिव्ह ऑईल आणि मोहोरीचे तेल रोजच्या वापरात असायला हवे. सुर्य फुलाच्या तेलात पॉलिअनसॅच्युरेडेट फॅटस यात भरपूर असतात. म्हणून वारंवार पदार्थ तळणं टाळायला हवं. नारळाच्या तेलात एलडीएल आणि एलडीएल आणि एचडीएल वाढवते. तुपात ब्युटीरेट आणि सीएलए असते (Ref) .म्हणून योग्य प्रमाणात तूप खावं पण जास्त खाल्ल्यास कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो. खरा धोका ट्रांसफॅट, हायड्रोजनीकृत तेल, वनस्पली तेल, डालडा यामुळे असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार ही तेलं खाणं टाळल्यास ५ लाख लोकांचा जीव दर वर्षाला वाचवता येऊ शकतो.
जेवण करण्यासाठी कोणतं तेल फायदेशीर?
वनस्पती घी किंवा डालडा हायड्रोजनीकृत तेल खरेदी करू नका. ऑलिव्ह ऑईलचा वापर तुम्ही सॅलेडमध्ये किंवा कमी तेलाच्या पदार्थांसाठी करू शकता. मोहोरीच्या तेल फोडणी देण्यासाठी उत्तम ठरतं. शेंगदाण्याचे तेल डीप फ्राय करण्यासाठी उत्तम आहे. सुर्यफुलाचे किंवा सोया तेल स्टिर फ्राईंगसाठी वापरू शकता पण वारंवार गरम करू नका. नारळाचे तेल आणि तूपाचा वापर करून पदार्थाला उत्तम चव येते. (Which Is Best Cooking Oil)
तुम्ही दिवसभरात एकाच तेलाचा वापर करण्याऐवजी तेलात बदल करूनही तेल वापरू शकता. जसं की सकाळच्या नाश्त्याला पराठा किंवा पोहे करायचे असतील तर मोहोरीच्या तेलाचा वापर करा ज्यामुळे चव येईल आणि ओमेगा-३सुद्धा मिळेल. भाजी करण्यासाठी मोहोरीच्या तेलाचा वापरही करू शकता.
ना तांदूळ भिजवायची झंझट, ना वाटायची कटकट; वाटीभर बेसनाच्या करा मऊसूत इडल्या
संध्याकाळच्यावेळी काही फ्राय करण्यासाठी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करा. रात्रीच्या जेवणात किंवा चपातीला लावण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. रात्रीच्या जेवणासाठी किंवा चपातीला लावण्यासाठी तुपाचा वापर करू शकता. नारळाचं तेल आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा वापरू शकता.
