Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? तेल विकत घेताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? तेल विकत घेताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

Which Is A Best Cooking Oil : स्वयंपाकासाठी कोणतं तेल उत्तम ठरतं समजून घेऊ. (Which Is A Best Cooking Oil)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:30 IST2026-03-31T13:13:11+5:302026-03-31T13:30:05+5:30

Which Is A Best Cooking Oil : स्वयंपाकासाठी कोणतं तेल उत्तम ठरतं समजून घेऊ. (Which Is A Best Cooking Oil)

Which Is A Best Cooking Oil : Which Oil Should Use For Daily Cooking | रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? तेल विकत घेताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं? तेल विकत घेताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

जास्त तेल खाल्ल्यानं शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं ज्यामुळे हृदयाच्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. ज्यांना कोलेस्टेरॉलची समस्या आहे त्यांना खराब तेल खाल्ल्यानं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. म्हणून तेल विकत घेताना काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी. स्वयंपाकासाठी कोणतं तेल उत्तम ठरतं समजून घेऊ. (Which Is A Best Cooking Oil)

रोजच्या स्वंयपाकासाठी कोणतं तेल वापरावं? (Which Oil Should Use For Daily Cooking)

नेहमी एकाच तेलाचा वापर करण्याऐवजी तुम्ही ठराविक वेळानंतर तेल बदलत राहायला हवं. एक महिना मोहरीच्या तेलाचा वापर केला तर दुसऱ्या महिन्यात शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करा. यामुळे शरीराला आवश्यक असलेले फॅट्स मिळतील.

तुमच्या कुकींग ऑईलमध्ये मोनो अनसॅच्युरडेटे आणि पॉली अनसॅचुरेडेट फॅट्स मिक्स होतील याची काळजी घ्या. पॉली अनसॅच्युरेडेटचे २ भाग असतात. यात एक ओमेगा-३ आणि दुसरा ओमेगा-६ असतो. दोन्ही हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गुणकारी ठरतात. सफोला, कनोल, सनफ्लोर ऑईल वापरायला हवे. मोनो अनसॅच्युरेडेटे फॅट ऑलिव्ह ऑईल, राईस ब्रान, मोहोरीचं तेल किंवा शेंगदाण्यांच्या तेलात जास्त असते.

स्वंयपाकासाठी उत्तम तेल कोणतं?

एक्सपर्ट्सच्यामते स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑईल, कनोला, सनफ्लावर ऑईल, मोहोरीचं तेल उत्तम मानलं जातं. हे तेल इंडियन कुकिंगच्या हिशोबानं उत्तम ठरतात.  स्वंयपाक करताना १ चमचा शुद्ध गाईचे तूप किंवा मोहोरीचं तेल, एक चमचा सनफ्लावर तेल मिसळा. या तेलाला ब्लेंडेड ऑईल असं म्हणतात जे बाजारात सहज मिळते.

तेल विकत घेताना कोणत्या गोष्टींची  काळजी घ्यावी?

जेव्हाही तुम्ही मार्केटमधून  तेल खरेदी कराल तेव्हा केमिकली एब्स्ट्रॅक्ट ऑईल ऐवजी प्रेस्ड ऑईल विकत घ्या. तेलाच्या बाटलीवर याबाबत लिहिलेले असते.

मोहोरीचे तेल प्रेस्ड ऑईलच्या लिस्टमध्ये येते. चांगल्या गुणवत्तेच्या तेलात ओमेगा ३, ६ आणि ९ असते. तेल विकत घेताना त्यावर ओमेगा-३ वर लिहिलेले असेल आणि ओमेगा-६ खाली लिहीले असेल याचा अर्थ की ओमेगा ३ जास्त आणि ओमेगा ६ कमी आहे.

तेल विकत घेताना तेलात ट्रान्स फॅट जीरो असायला हवं. ही पूर्ण माहिती तुम्हाला तेलाच्या पॅकींगवर लेबलवर लिहिलेली दिसून येईल.

Web Title : खाना पकाने का सबसे अच्छा तेल: स्वास्थ्य के लिए सोच-समझकर चुनें।

Web Summary : सही कुकिंग ऑयल चुनना दिल के स्वास्थ्य के लिए ज़रूरी है। संतुलित वसा के लिए सरसों और मूंगफली जैसे तेलों को बदल-बदल कर इस्तेमाल करें। ओमेगा-3 और मोनोअनसैचुरेटेड वसा से भरपूर तेलों की तलाश करें। शून्य ट्रांस वसा वाले प्रेस्ड ऑयल चुनें।

Web Title : Best cooking oil: Choose wisely for health, consider these points.

Web Summary : Choosing the right cooking oil is crucial for heart health. Rotate oils like mustard and groundnut for balanced fats. Look for oils rich in omega-3 and monounsaturated fats. Opt for pressed oils with zero trans fat.