Tomato Side Effects : टोमॅटो ही अशी भाजी आहे जी भरपूर लोक आवडीने खातात. इतकंच नाही तर टोमॅटोचा वापर इतर भाज्या किंवा पदार्थांमध्येही केला जातो. टोमॅटोची आंबट-गोड टेस्ट सगळ्यांनाच आवडते. सोबतच टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात, मात्र गरजेपेक्षा जास्त टोमॅटो खाल्ल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणामांऐवजी नकारात्मक परिणाम होऊ शकतात. काही लोकांना तर टोमॅटो टाळण्याचाच सल्ला दिला जातो. जास्त टोमॅटो खाल्ल्याने गट हेल्थ गंभीरपणे बिघडू शकते. अॅसिडिटी आणि ब्लोटिंगसारख्या पोटाच्या तक्रारी टाळायच्या असतील, तर टोमॅटो मर्यादेतच खाणे आवश्यक आहे.
लक्ष देण्यासारखी गोष्ट
जे लोक मोठ्या प्रमाणात टोमॅटो खातात, त्यांना इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) ची लक्षणे जाणवू शकतात. तसेच टोमॅटोमुळे अॅसिडिटी आणि हार्टबर्नसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला IBSचा त्रास असेल, तर टोमॅटो खाणे टाळावे. अॅसिडिटी किंवा हार्टबर्न होत असेल तरी टोमॅटो टाळण्याचा सल्ला दिला जातो.
जास्त टोमॅटो खाऊ नका
टोमॅटोचा स्वभाव अॅसिडिक असतो. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्यामुळे मूत्राशयात जळजळ होऊ शकते. अशा प्रकारच्या समस्या टाळायच्या असतील, तर गरजेपेक्षा जास्त टोमॅटो खाणे टाळा, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. टोमॅटो आरोग्यासाठी तेव्हाच फायदेशीर ठरतात, जेव्हा ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ले जातात.
किडनी स्टोनच्या रुग्णांनी सावध राहावे
टोमॅटोच्या बिया किडनी स्टोनचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांना टोमॅटो टाळण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय, जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्यामुळे काही लोकांना अॅलर्जीची समस्या देखील उद्भवू शकते.
