Healthy Drinks: धावपळीचं जीवन, जबाबदाऱ्यांचा वाढता ताण, चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे लोक आज वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. अशात आरोग्याची काळजी घेणंही आधीपेक्षा वाढलं आहे. बरेच लोक त्यांच्या डाएटमध्ये डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करतात. डिटॉक्स वॉटर किंवा ड्रिंक हे वेगवेगळे मसाले, भाज्या, फळांपासून तयार केले जातात. या ड्रिंक्सच्या माध्यमातून शरीराची आतून स्वच्छता होते आणि नुकसानकारक विषारी तत्व बाहेर पडतात. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होतो. मात्र, अनेकदा लोक याबाबत कन्फ्यूज असतात की, कोणती समस्या असल्यावर कोणतं डिटॉक्स वॉटर प्यायला हवं. याबाबत न्यूट्रिशनिस्ट सिमरन कथूरिया यांनी माहिती दिली आहे.
कधी प्यावं कोणतं डिटॉक्स वॉटर?
न्यूट्रिशनिस्ट सिमरन कथूरिया म्हणाल्या की, डिटॉक्स वॉटर नॅचरल क्लींजर असतात, जे रोज प्यायल्यास मेटाबॉलिज्म बूस्ट होतं, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, पचन तंत्र मजबूत होतं आणि वजनही कमी होतं. मात्र, न्यूट्रिशनिस्टचं मत आहे की, प्रत्येक हेल्दी गोष्ट तुमच्या शरीरासाठी हेल्दी असेल हे गरजेचं नाही. त्यामुळे कधी कोणटं डिटॉक्स वॉटर प्यावं आणि कधी कोणतं पिऊ नये हे माहीत असलं पाहिजे.
भेंडीचं पाणी
भेंडीचं पाणी डायबिटीसच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर असतं. पण जर तुमची क्रिएटिनिन लेव्हल जास्त असेल किंवा तुम्हाला किडनीसंबंधी काही समस्या असेल तर तुम्ही भेंडीच्या पाण्याचं डिटॉक्स वॉटर पिऊ नये.
मेथीचं पाणी
जर तुम्हाला पीसीओडी असेल किंवा डायबिटीस असेल तर तुमच्यासाठी मेथीचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. पण जर तुम्हाला एक्नेची समस्या असेल किंवा तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं राहत असेल तर तुम्ही मेथीचं पाणी पिणं टाळलं पाहिजे.
बार्ली वॉटर
हे डिटॉक्स ड्रिंक कोलेस्टेरॉल वाढलेले लोक पिऊ शकतात. बार्लीचं पाणी कोलेस्टेरॉल आणि यूरिक अॅसिड कमी करण्यास प्रभावी ठरतं. पण आर्थराययटिस आणि अंगदुखीची समस्या असेल तर हे पाणी पिऊ नये.
दालचीनीचं पाणी
मेटाबॉलिजम आणि डायबिटीससाठी दालचीनीचं पाणी खूप फायदेशीर असतं. पण ज्यांना एक्नेची समस्या असेल किंवा यूटीआयची समस्या असेल तर दालचीनीचं पाणी पिऊ नये.