Health Tips : पिकलेल्या फणसाचा (jackfruit) गर किंवा कच्च्या फणसाची भाजी भरपूर लोक आवडीने खातात. याची भाजी टेस्टी तर लागतेच, सोबत आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. फणसामध्ये फायबर, व्हिटामिन्स आणि अॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक तत्व शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांसाठी खूप महत्वाचे असतात. तसेच फणस खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही खूप वाढते.
लहान, मोठे सगळेच फणसाचा आनंद घेतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, फणसासोबत कोणत्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे. आज आपण हेच बघणार आहोत की, फसणासोबत काय खाऊ नये आणि का?
फणसासोबत मासे
फणसासोबत मासे खाणं नुकसानकारक ठरू शकतं. असं केल्यास त्वचेसंबंधी समस्या, अॅलर्जी आणि पचनासंबंधी समस्यांचा धोका वाढतो. मासे आणि फणस दोन्ही गोष्टी गरम असतात. त्यामुळे या सोबत खाल्ल्या तर शरीरात उष्णता वाढू शकते आणि पचनावर याचा वाईट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या तर गॅस, अॅसिडिटी आणि अपचन अशा पोटासंबंधी समस्या होऊ शकतात.
फणस आणि डेअरी प्रॉडक्ट्स
फणसासोबत कोणत्याही प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट्स अजिबात खाऊ नये. असं केल्यास गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. खासकरून उन्हाळ्यात हे कॉम्बिनेशन खूपच घातक ठरू शकतं. सोबतच त्वचेसंबंधीही वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
फणस आणि दारू
फणस खाण्याआधी किंवा नंतर कोणतंही अल्कोहोलिक ड्रिंक पिणं महागात पडू शकतं. असं केल्यानं लिव्हरचं मोठं नुकसान होतं. लिव्हरवर अधिक दबाव पडतो. ज्यामुळे पचन तंत्र बिघडतं. तसेच शरीरात भरपूर विषारी तत्वही जमा होतात. त्यामुळे फणसासोबत कधीच दारू पिऊ नये.