Join us

चहा फक्कड होण्यासाठी चहा करताना आधी दूध उकळवायचं की पाणी? ९९% लोक करतात 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:33 IST

What Should be Added First In Tea (How To Make Milk Tea At Home) : उत्तम चहा करण्यासाठी सुरूवातीला बेस चांगला असायला हवा.

सकाळची सुरूवात चहाशिवाय अपूर्ण असते. दुधाचा चहा फक्त एक ड्रिंक नाही तर सकाळची एनर्जी, मूड आणि दिवसभर ताजंतवानं राहण्याचं सिक्रेट आहे. प्रत्येक घरात सकाळची सुरूवात चहा किंवा कॉफीनं होते. काहीजणांना दर ३-४ तासांनी चहा पिण्याची सवय असते. पण चहाची चव आणि सुगंध या गोष्टीवर अवलंबून असतो की तुम्ही दूध कधी घालता आणि पाणी कधी उकळवता. बऱ्याच लोकांना चहा करण्याची योग्य पद्धत माहिती नसते. (How To Make Milk Tea At Home)

परफेक्ट चहा कसा करायचा? (How To Make Perfect Milk Tea)

उत्तम चहा करण्यासाठी सुरूवातीला बेस चांगला असायला हवा. पाणी आणि मसाल्यांनी चहा उत्तम लागतो. चहा करण्यासाठी सगळ्यात आधी एका चहाच्या भांड्यामध्ये पाणी उकळवून घ्या. पाण्यात आपल्या आवडीचे मसाले हिरवी वेलची, दालचिनी, तेलपत्ता आणि काळी मिरी घाला. थोडी साखर किंवा गूळ घालून मसाल्यांसोबत व्यवस्थित उकळवून घ्या. असं केल्यानं चहाचा फ्लेवर परफेक्ट होतो आणि चव दुप्पटीनं वाढते.

चहात दूध कधी घालायचं? (When to Add Milk In Tea)

चहात दूध घालण्याची योग्य वेळ पाणी उकळल्यानंतर असते. तर तुम्ही दूध घालून चहा उकळवत असाल तर मसाल्यांची योग्य चव येणार  नाही. पाण्यात मसाले योग्य पद्धतीनं उकळवल्यानंतर दूध मिसळा आणि मंद आचेवर काही मिनिटं उकळवून घ्या. यामुळे चहाला परफेक्ट रंग येईल आणि चवही चांगली लागेल.

चहा करताना झाकण ठेवायचं की नाही?

चहा झाल्यानंतर लगेच गॅस बंद करा आणि १ ते २ मिनिटं झाकून ठेवा. ज्यामुळे वाफ पूर्ण कपमध्ये पसरते आणि चांगला फ्लेवर येतो. ही छोटी स्टेप चहाला अधिकच स्पेशल बनवते. यामुळे चहा पिणारा तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

दुधाचा चवदार चहा कसा करायचा? (Milk Tea Making Tips)

ताजं दूध आणि स्वच्छ पाण्याचा वापर करा. मसाले हलके क्रश करून घ्या  जेणेकरून चांगली चव येईल.साखर किंवा गूळ चवीनुसार वापरा. जास्तवेळ  चहा उकळू नका अन्यथा चव कडवट होते. चहा गाळण्याआधी झाकण ठेवा.

दुधाचा चहा का प्यायचा? (Benefits Of Drinking Tea)

कॅफेनमुळे दिवसभराची एनर्जी मिळते. दुधाचा कडक चहा घेतल्यानं घश्यातील खवखव, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. हे एका इम्युनिटी बुस्टरप्रमाणे काम करते.  यात आलं, वेलची, दालचिनी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न