आपण पदार्थ जरी वेगवेगळे तयार केले तरी काही सामग्री ही जवळपास सगळ्याच पदार्थांसाठी सारखी वापरली जाते. हळद, मीठ, मसाले इतरही काही पदार्थ आपण रोज वापरतो. (What is the real reason for using asafoetida in cooking? A pinch of asafoetida is beneficial for babies too..)फोडणी तयार करताना आपण त्यामध्ये हिंग वापरतो. ताकामध्ये हिंग घालतो. इतरही काही पदार्थांवर हिंग भुरभुरतो. पण हिंग वापरण्यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का? आपण कधी कधी हिंग फोडणीची चव थोडीच वाढवते म्हणून हिंग वापरत नाही. (What is the real reason for using asafoetida in cooking? A pinch of asafoetida is beneficial for babies too..)मात्र हिंग वापरायलाच हवे. कारण हिंग चव वाढवण्यासाठी वापरणे जरी गरजेचे नसले तरी, अन्न पचवण्यासाठी गरजेचे असते. ट्रुमेड्स तसेच मेडीसिननेट अशा विविध साईट्सवर माहिती उपलब्ध आहे. खाल्लेले अन्न जिरवण्यासाठी पचनसंस्थेला हिंगामुळे मदत होते.
१. पोट दुखत असताना आई पोटाला हिंग लावायला सांगते. कारण हिंग गॅसेस शरीराबाहेर ओढून काढते. अपचनामुळे किंवा जागरणामुळे तसेच तळलेले तेलकट पदार्थ खाल्यामुळे पोटामध्ये भरपूर गॅस तयार होतो. पोट गच्च होऊन दुखायला लागते. असा त्रास होत असताना पोटाला हिंग व पाणी असा लेप तयार करून चोळायचा. हळूहळू पोट दुखायचे थांबते. व्यवस्थित साफ होते.
२. तिखट पदार्थ किंवा तेलकट पदार्थ तयार करताना त्यामध्ये चमचाभर हिंग घालणे फार उपयुक्त ठरते. तसेच डाळी पचायला जरा जड असतात. त्यामुळे आपण आमटी किंवा वरण तयार करताना त्यामध्ये हिंग घालतो. हिंगामुळे अन्न पटकन पचते. चमचमीत पदार्थांचा पचनसंस्थेला त्रास होत नाही.
३. पाळीच्या दिवसात सुद्धा पोटाला हिंग लावणे फायद्याचे ठरते. पाळीमध्ये ब्लोटिंग होते. पोटामध्ये गॅस आणि घाण अडकून राहते. हिंगामुळे तो गॅस कमी होतो. गॅस कमी झाल्यावर वेदनाही कमी होतात. पोटही साफ होते.
४.हिंगामध्ये अँण्टी बॅक्टेरिल गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आजारांचाही धोका टाळता येतो. हिंग शरीरातील उष्णताही कमी करते. त्यामुळे ताकामध्ये हिंग घालून प्यायले जाते.
५. मात्र हिंगाचा अति वापरही त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे योग्य प्रमाणातच हिंग वापरा.