Lokmat Sakhi >Food > पांढरे, काळे, लाल की भुरके...कोणते तांदूळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? पाहा प्रत्येकाचे वेगळे फायदे

पांढरे, काळे, लाल की भुरके...कोणते तांदूळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? पाहा प्रत्येकाचे वेगळे फायदे

Rice Type And Their Benefits :पांढऱ्या तांदळापेक्षाही ब्राऊन, ब्लॅक आणि रेड तांदूळ पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत जास्त हेल्दी मानले जातात. पण का हे आज आपण पाहणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:05 IST2025-09-02T12:04:40+5:302025-09-02T12:05:38+5:30

Rice Type And Their Benefits :पांढऱ्या तांदळापेक्षाही ब्राऊन, ब्लॅक आणि रेड तांदूळ पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत जास्त हेल्दी मानले जातात. पण का हे आज आपण पाहणार आहोत.

What Is the Healthiest Rice? 4 Types and Their Nutrients | पांढरे, काळे, लाल की भुरके...कोणते तांदूळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? पाहा प्रत्येकाचे वेगळे फायदे

पांढरे, काळे, लाल की भुरके...कोणते तांदूळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर? पाहा प्रत्येकाचे वेगळे फायदे

Rice Type And Their Benefits : भात म्हटला किंवा तांदूळ म्हटले तर जास्तीत जास्त लोकांच्या डोळ्यांसमोर पांढरा तांदूळ येतो. मोठ्या संख्येने लोक पांढऱ्या तांदळाचा भात खातात. कारण हे तांदूळ सहज शिजतात, स्वस्तात मिळतात आणि लवकर पचनही होतात. पण बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ मिळतात. काळे, भुरके आणि लाल तांदुळही असतात. ज्यांमध्येह भरपूर पोषक तत्व असतात. त्यामुळे पांढऱ्या तांदळापेक्षाही ब्राऊन, ब्लॅक आणि रेड तांदूळ पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत जास्त हेल्दी मानले जातात. पण का हे आज आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण पांढऱ्या तांदळाचे फायदे बघणार आहोत.

पांढऱ्या तांदळाचे फायदे

पांढऱ्या तांदळातून आपल्याला ऊर्जा मिळते. आपलं शरीर याला सहजपणे तोडू शकतं. तसेच यातील पोषक तत्व आणि कार्बोहायड्रेट वेगाने अवशोषित होतात. कारण यात चोकर कमी असतं. सोबतच यात फायबर आणि फॅटचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे पांढरे तांदूळ लोकांसाठी एक चांगला पर्याय आहेत. 

ब्राउन राइस

ब्राउन राइस कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे जे फायबर, प्रोटीन आणि फॅटने भरलेले असतात. हे पचनास काही लोकांसाठी फार अवघड असू शकतात. पांढऱ्या तांदळांमुळे शरीरातील जळजळ कमी करता येते, पण ब्राउन राइस हे काम थोडं उशिरा करतं. जर तुम्हाला गंभीर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर पांढरे तांदूळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. 

रेड राइस

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत रेड राइस तेवढे कॉमन नाहीयेत. हा राइस महाग असतो. तसेच दुकानांमध्ये फार कमी उपलब्ध असतो. पांढरे तांदूळ तुमच्या आरोग्यासाठी पूर्णपणे खराब ठरू शकत नाही. जर तुम्ही हे कमी प्रमाणात खाल्ले तरच. पण रेड राइस तुम्हाला सगळ्या स्थितीत फायदे देतो. पौष्टिक जेवण बनवण्यासाठी तुम्ही यात इतर पौष्टिक गोष्टींचं मिश्रण करू शकता. रेड राइजमध्ये अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात जसे की, सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि बिटा कॅरोटीन.

ब्लॅक राइस

ब्लॅक राइस फार हेल्दी मानले जातात. यातील एंथोसायनिन डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. नियमितपणे हे खाल्ले तर मोतिबिंदू आणि डायबिटीक रेटिनोपॅथीसारखा धोका कमी करण्यास मदत मिळते. ब्लॅक राइसमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तत्व हृदय हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. तसेच याने डायबिटीसचा धोकाही कमी होतो.

Web Title: What Is the Healthiest Rice? 4 Types and Their Nutrients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.