Lokmat Sakhi >Food > उपमा - उप्पीट आणि सांजा यात काय फरक असतो? रव्याचे सेम सेम तरी नावे वेगळी का..

उपमा - उप्पीट आणि सांजा यात काय फरक असतो? रव्याचे सेम सेम तरी नावे वेगळी का..

What is the difference between Upma , Uppit and Sanja? : पाहा काय फरक आहे उपमा, सांजा आणि उप्पीटामध्ये ? जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 20:27 IST2025-03-12T20:26:38+5:302025-03-12T20:27:28+5:30

What is the difference between Upma , Uppit and Sanja? : पाहा काय फरक आहे उपमा, सांजा आणि उप्पीटामध्ये ? जाणून घ्या.

What is the difference between Upma , Uppit and Sanja? | उपमा - उप्पीट आणि सांजा यात काय फरक असतो? रव्याचे सेम सेम तरी नावे वेगळी का..

उपमा - उप्पीट आणि सांजा यात काय फरक असतो? रव्याचे सेम सेम तरी नावे वेगळी का..

आपण नाश्त्याला उपमा बरेचदा करतो. काही जण म्हणतात, आम्ही नाश्त्याला उप्पीट केले होते. तर काही म्हणतात, आज तिखट सांजा केला होता. ( What is the difference between Upma , Uppit and Sanja? )मात्र तयार केलेला उपमाच असतो. हे तिन्ही पदार्थ सारखेच वाटले तरी त्याच्या चवीमध्ये जरा फरक असतो. कारण एकाच पदार्थाची ही तीन नावे नाहीत .तिन्ही वेगवेगळे पदार्थ आहेत. ( What is the difference between Upma , Uppit and Sanja? )तिन्ही पदार्थांमध्ये मुख्य भाग हा रवाच असतो. पण तयार करण्याची पद्धत जरा वेगळी असते. चला पाहूया या तिन्ही पदार्थांमध्ये काय फरक असतो.

उपमा व उप्पीट बऱ्यापैकी सारखेच पदार्थ आहेत. दक्षिण भारतामध्ये उपमा असे म्हटले जाते. मात्र कन्नड भाषिक लोक त्याला उप्पीट असे म्हणतात. पुण्यासारख्या ठिकाणी उप्पीट हे उपम्यापेक्षा जरा जास्त पातळ असते. मऊ असते. त्यामध्ये फार काही भाज्या घातल्या जात नाहीत. साध्या फोडणीमध्ये ते तयार केले जाते. उप्पीट तयार करताना त्यावर भरपूर कोथिंबीर घातली जाते. यापेक्षाही वेगळी उप्पीटची व्याख्या असूच शकते. कारण भारतामध्ये विविध ठिकाणी पदार्थ विविध प्रकारे तयार केला जातो. उपम्यामध्ये भाज्या घातल्या जातात. 

गोड सांजा म्हणजे शीरा. पण तिखट सांजा हा उपम्याचाच प्रकार आहे. मात्र सांजा हा जरा मोकळा असतो. तसेच उपीट, उपमा तयार करताना त्यामध्ये डाळींचा वापर केला जातो. पण सांजा तयार करताना त्यामध्ये कोणत्याही डाळी घातल्या जात नाहीत. सांजा शक्यतो तुपावरच तयार केला जातो. तसेच सांजा रंगाला पिवळा असतो.   

महाराष्ट्रीन पद्धतीने सांजा तयार करण्याची रेसिपी 

साहित्य
रवा, कांदा, कोथिंबीर, कडीपत्ता, जिरं, मोहरी, आलं, मीठ, हळद, शेंगदाणे, हिरवी मिरची, तूप, पाणी

कृती
१. रवा मस्त परतून घ्यायचा. त्याचा रंग बदलायला लागला की गॅस बंद करून टाकायचा. 
२. एका कढईमध्ये तूप घ्यायचे मग त्यामध्ये शेंगदाणे परतून बाजूला काढून ठेवायचे.
३. त्याच कढईमध्ये जिरं, मोहरी, आलं, मीठ, हळद घालून फोडणी  तयार करून घ्यायची. मिरचीही घालायची.


४ .त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, कडीपत्ता घालायचा. सगळं छान परतून घ्यायचे.
५. फोडणीमध्ये रवा घालायचा. तो जरा परतून घ्यायचा.
६. त्यामध्ये गरम पाणी घाला. गार पाणी घालू नका. कडकडीत पाणी घाला. जेवढा रवा तेवढंच पाणी वापरा. वाफ काढून घ्या.

अनेक जणं सांजा तयार करताना त्यामध्ये दही घालतात. किंवा ताक वापरतात.

Web Title: What is the difference between Upma , Uppit and Sanja?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.