Vegetable Storing Tips : फ्रिजमध्ये वेगवेगळ्या खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी स्टोर केल्या जातात. पण फ्रिजमध्ये पदार्थ किंवा पालेभाज्या स्टोर करताना बरेच लोक काही चुका करतात. पालेभाज्या फ्रिजमध्ये सामान्यपणे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवतात. पण ही सवय आता बदलण्याची वेळ आली आहे. असं केल्याने प्लास्टिकमध्ये बंद भाज्यांना ना योग्य हवा मिळत आणि ना त्यांमधील ओलावा देखील बाहेर पडतो. असं केल्याने भाज्या लवकर खराब होतात आणि त्यांमध्ये बॅक्टेरिया वाढतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशात छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आपण आपलं खाणं-पिणं विषारी होण्यापासून वाचवू शकतो. भाज्या फ्रिजमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवण्याने काय काय समस्या होऊ शकतात हे जाणून घेऊया.
काय होतात समस्या?
हवा सर्कुलेट न होणं - प्लास्टिकच्या कव्हरमुळे हवेचा फ्लो रोखला जातो. भाज्यांना श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते. जेव्हा हवा खेळती राहत नाही, तेव्हा भाज्यांमधील ओलावा सुद्धा आतच अडकून राहतो. त्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस वाढण्याचा धोका अधिक असतो, ज्यामुळे भाज्या सडू लागतात.
केमिकलचा धोका - अनेक प्लास्टिकच्या पिशव्या या बिस्फेनॉल-ए आणि थॅलेट्ससारख्या नुकसानकारक केमिकल्सपासून बनवल्या जातात. जेव्हा कमी क्वालिटीच्या प्लास्टिक पिशव्या फ्रिजमध्ये ठेवल्या जातात, तेव्हा त्यांमधील केमिकल भाज्यांमध्ये मिक्स होऊ शकतात. हे केमिकल मिक्स झालेल्या भाज्या खाल्ल्याने हार्मोनमध्ये अंसतुलन आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकतात.
टेस्ट आणि पोषक तत्वांचं नुकसान - प्लास्टिक बॅगमध्ये ठेवलेल्या भाज्यांची नॅचरल टेस्ट आणि ताजेपणा नष्ट होतो. खासकरून पालेभाज्या लवकरच खराब होतात, ज्यामुळे त्यांमधील आवश्यक व्हिटामिन आणि पोषक तत्वांचं नुकसान होऊ शकतं.
स्टोरेज करण्याची योग्य पद्धत?
भाज्या प्लास्टिक कव्हरमधून काढा आणि स्टोर करण्याआधी थोडा वेळ त्या मोकळ्या हवेत ठेवा. तसेच भाज्या ठेवण्यासाठी कॉटन बॅग किंवा जाळीदार पिशव्यांचा वापर करावा. पालेभाज्या पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवल्यास जास्त वेळ ताज्या राहतात. भाज्या फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी त्या कोरड्या असतील याची काळजी घ्या. नाही तर त्यांमध्ये बुरशी लागू शकते.
