Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिळी चपाती खावी का? डॉक्टर म्हणतात, शिळी चपाती कुणी आणि कधी खावी याचे लक्षात ठेवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:12 IST

डॉ. अमरिंदर सिंह सांगतात की शिळ्या चपातीत रात्रभर स्टार्चचे स्वरूपात बदलते. ज्याला वैद्यकिय परिभाषेत रेजिस्टंस्ट स्टार्च असंही म्हणतात.

चपात्या (Chapati) प्रत्येक घरांत खाल्ल्या जातात. चपात्यांचे सेवन तब्येतीसाठी बरेच फायदेशीर मानले जाते. पण रात्रीची उरलेली चपाती खराब समजून फेकून देण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे या चपात्यांचा आहारात समावेश करू सकता. यामुळे काही नुकसान होत नाही पण शरीराला बरेच फायदे मिळतात. एम्सचे डॉ. अमरिंदर सिंह मल्ही यांच्या म्हणण्यांनुसार शिळी चपाती खाल्ल्यानं शरीराला ताजी चपाती खाण्याइतकाच फायदा होतो. शिळी चपाती का खावी, समजून घेऊ. (What Happens If You Eat Stale Roti Aiims Doctor Explains Its Benefits And Disadvantages)

डॉ. अमरिंदर सिंह सांगतात की शिळ्या चपातीत रात्रभर स्टार्चचे स्वरूपात बदलते. ज्याला वैद्यकिय परिभाषेत रेजिस्टंस्ट स्टार्च असंही म्हणतात. हे स्टार्च हळूहळू पचते आणि अचानक वाढणारी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

 शिळी चपाती खाण्याचे फायदे

 शिळ्या चपातीमुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो ज्यामुळे ब्लड शुगर हळूहळू वाढते. चपाती खाल्ल्या खाल्या पटकन शुगर लेव्हल स्पाईक होत नाही.

 पोटासाठी फायदेशीर 

 रेजिस्टंस स्टार्च प्रीबायोटीकप्रमाणे काम करते. ज्यामुळे गॅसेसच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. 

 वजन नियंत्रणात राहतं

शिळी चपाती खाल्ल्यानं बराचवेळ पोट भरलेलं राहतं ज्यामुळे सतत भूक लागत नाही. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

 कोलेस्टेरॉलवर सकारात्मक परिणाम

 शिळी चपाती आतड्यांतील फॅट एब्जॉर्प्शन कमी करते. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कंट्रोल होण्यास मदत होते.

शिळी चपाती कधी खाऊ नये?

 फंगल इ्न्फेक्शनचा धोका तेव्हा असतो जेव्हा चपाती उघड्यावर ठेवलेली असते. त्यावर पांढरे, हिरवे किंवा काळे डाग असतील किंवा बुरशी आली असेल तर किडनी, लिव्हरसाठी घातक ठरू शकतं.

 फूड पॉइजनिंगचा धोका

चुकीच्या पद्धतीनं स्टोरेज केल्यास बॅक्टेरियाजचा धोका वाढतो. ज्यामुळे पोटदुखी, उलट्या, मळमळ  असे त्रास उद्भवतात. चपाती नेहमी सुती कापडात झाकून ठेवायला हवी. कोरड्या आणि थंड  जागेवर ठेवा. २४ तासांपेक्षा आधी केलेली चपाती खाणं टाळा. खाण्याआधी चपाती हलकी गरम करून घ्या. शिळी चपाती तेव्हाच औषधाप्रमाणे काम करते जेव्हा ती सुरक्षित ठेवली असेल. अन्यथा शिळी चपाती विषारी ठरू शकते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Stale Chapati: Eat or Not? AIIMS Doctor Explains Benefits, Risks

Web Summary : Stale chapati offers benefits like controlled blood sugar and improved digestion due to resistant starch. However, avoid if moldy or improperly stored to prevent food poisoning. Consume within 24 hours, after reheating.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स