Join us

रोज बिटाचा ज्यूस प्यायल्यानं आरोग्याला काय फायदे मिळतात? वाचाल तर रोज प्याल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:13 IST

Beetroot Juice Benefits : तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिले असतील किंवा पोस्ट पाहिल्या असतील ज्यात बिटाचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. पण लोकांना बिटाचा ज्यूस पिण्याचे फायदे काय होतात हे माहीत नसतं.

Beetroot Juice Benefits : रोज वेगवेगळ्या फळांचे किंवा भाज्यांचे ज्यूस पिणं किती फायदेशीर ठरतं हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. फळं आणि भाज्यांचे ज्यूस सकाळी उपाशीपोटी पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिले असतील किंवा पोस्ट पाहिल्या असतील ज्यात बिटाचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. पण लोकांना बिटाचा ज्यूस पिण्याचे फायदे काय होतात हे माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बिटाचा ज्यूस पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जे अनेकांना माहीत नसतात. यात भरपूर पोषक तत्व असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.बिटाच्या ज्यूसमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक, कॉपर आणि मिनरल्स असतात. बिटाचा ज्यूस रोज प्यायल्यानं शरीरात रक्त तर वाढतंच, सोबतच शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत मिळते. हे बिटाच्या ज्यूसचं सगळ्यात महत्वाचं काम आहे.

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर बिटाचा ज्यूस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कारण यात कॅलरी कमी असतात. अशात जर तुम्ही नियमितपणे बिटाचा ज्यूस प्याल तर तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिज्म मजबूत असणं खूप महत्वाचं असतं. जर मेटाबॉलिज्म मजबूत नसेल तर तुमच्या शरीरातील चरबी अजिबात कमी होणार नाही. मेटाबॉलिज्म मजबूत करण्यासाठी तुम्ही रोज बिटाच्या ज्यूस पिऊ शकता.

महिलांना शरीरात रक्त कमी होण्याची समस्या अधिक होते. मासिक पाळीदरम्यान जास्त रक्त जातं. ज्यामुळे शरीरात रक्त कमी होतं आणि कमजोरी अधिक जाणवते. अशात बिटाचा ज्यूस तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. कारण यानं शरीरात रक्ताचं प्रमाण वाढतं.

बिटामध्ये फायटोकेमिकल आणि बीयासायनिनसारखे अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे ब्लड फ्लो सुरळीत करण्यास मदत करतात. सोबतच लिव्हरच्या समस्या दूर करण्यासही मदत करतात. इतकंच नाही तर बिटाच्या ज्यूसमध्ये अनेक असे व्हिटामिन्स असतात जे त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर असतात. तसेच केसही हेल्दी राहतात.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य