Lokmat Sakhi >Food > रोज उपाशीपोटी खा एक चमचा तूप, येईल रुप-फायदे एकापेक्षा एक-तब्येत ठणठणीत

रोज उपाशीपोटी खा एक चमचा तूप, येईल रुप-फायदे एकापेक्षा एक-तब्येत ठणठणीत

Ghee Benefits For Health : तूपानं शरीराला अनेक फायदे मिळतात असं सांगितलं जातं. पण याचे फायदे सगळ्याच लोकांना माहीत असतात असं नाही. तेच फायदे आज आपण पाहणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:10 IST2025-08-22T19:39:41+5:302025-08-22T20:10:14+5:30

Ghee Benefits For Health : तूपानं शरीराला अनेक फायदे मिळतात असं सांगितलं जातं. पण याचे फायदे सगळ्याच लोकांना माहीत असतात असं नाही. तेच फायदे आज आपण पाहणार आहोत.

What are the benefits of having one spoon ghee an empty stomach | रोज उपाशीपोटी खा एक चमचा तूप, येईल रुप-फायदे एकापेक्षा एक-तब्येत ठणठणीत

रोज उपाशीपोटी खा एक चमचा तूप, येईल रुप-फायदे एकापेक्षा एक-तब्येत ठणठणीत

Ghee Benefits For Health : गेल्या काही दिवसांपासून लोक आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. त्यात एक उपाय बरेच लोक करतात. तो म्हणजे सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप खाणं. अनेक हेल्थ एक्सपर्ट हा उपाय करण्याचा सल्ला देत असतात. यानं शरीराला अनेक फायदे मिळतात असं सांगितलं जातं. पण याचे फायदे सगळ्याच लोकांना माहीत असतात असं नाही. तेच फायदे आज आपण पाहणार आहोत.

सकाळी उपाशीपोटी तूप खाण्याचे फायदे

इम्यूनिटी वाढते

तूपामध्ये ब्यूटिरिक अ‍ॅसिड भरपूर असतं जे शरीरातील वेगवेगळ्या आजारांसोबत लढण्याची शक्ती वाढतं. याच्या सेवनाने आजारांसोबत लढणाऱ्या पेशींची वाढ होते. 

वजन कमी होतं

तूप खाल्ल्यानं वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच वाढलेलं पोट कमी होण्यासही तूपाची मदत होते. कारण याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं ज्याने शरीरातील चरबी कमी होते. सकाळी एक चमचा तूप खाल्ल्यास भूकही कंट्रोल राहते. पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.

त्वचेलाही होतात फायदे

तूप खाल्ल्यानं त्वचेला सुद्धा भरपूर फायदे मिळतात. यात असलेल्या व्हिटामिन्समुळे त्वचा सैल होत नाही, सुरकुत्या पडत नाहीत. तसेच त्वचेवर तूप लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

पचनक्रिया चांगली राहते

तूपामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. याने पोट आणि पचन चांगलं राहतं. रोज सकाळी एक चमचा तूप खाल्ल्यास पचन तंत्र मजबूत राहतं. यानं पोट चांगलं राहतं आणि अल्सर व कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.

हाडं होतात मजबूत

तूपानं हाडंही मजबूत होण्यास मदत मिळते. कारण यात भरपूर व्हिटामिन के असतं जे कॅल्शिअमचं अवशोषण वाढवण्यास मदत करतं. तसेच याने दातांना कीडही लागत नाही.

Web Title: What are the benefits of having one spoon ghee an empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.