Black Carrot Benefits: थंडीच्या दिवसांमध्ये लाल गाजर बाजारात भरपूर मिळतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने गाजर खातात. गाजराचा हलवा तर अनेकांच्या आवडीचा असतो. गाजर डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. लाल गाजर टेस्टी तर असतातच, सोबतच यात व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात आढळतं. पण आपण पाहिलं असेल की, गाजर केवळ लाल किंवा केशरीच नसतात, तर ते काळेही असतात. काळे गाजर सुद्धा खूप फायदेशीर मानले जातात. गाजरांच्या या वेगवेगळ्या रंगांचं कारण त्यातील पोषक तत्व असतात. अशात आज आपण काळ्या गाजरांचे फायदे जाणून घेणार आहोत.
लालपेक्षा काळे गाजर जास्त फायदेशीर
काळे गाजर लाल गाजरांपेक्षा जास्त फायदेशीर मानले जातात. एंथोसायनिन नावाच्या अॅंटी-ऑ्क्सिडेंटमुळे काळ्या गाजरांना लालपेक्षा अधिक फायदेशीर मानलं जातं. काळ्या गाजरांचं पिक कुठेही सहजपणे घेतलं जाऊ शकतं. महत्वाची बाब म्हणजे काळे गाजर हे कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यात फायदेशीर मानले जातात. त्याशिवाय कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि पचन तंत्र सुधारण्यासही याने मदत मिळते. काळे गाजर सलाद, भाजी, सूप, ज्यूस किंवा दुसऱ्या पदार्थांमध्ये टाकूनही खाल्ले जाऊ शकतात. महत्वाची बाब म्हणजे काळ्या गाजरांची टेस्टही सामान्य गाजरांसारखीच असते.
काळ्या गाजराचे फायदे
पचनासाठी फायदेशीर - गाजर अन्न पचन होण्यासाठी चांगले असतात. काळे गाजर खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर करतात येतात. कारण यात फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
डायबिटीसमध्ये फायदेशीर - शुगरचे रूग्ण काळे गाजर खाऊ शकतात. काळ्या गाजराचं ज्यूस पिणं डायबिटीसमध्ये फायदेशीर ठरू शकतं. रोज काळ्या गाजराचं ज्यूस प्यायल्याने मधुमेहाचा धोका कमी केला जाऊ शकतो.
कोलेस्टेरॉल कमी होतं - काळे गाजर नेहमीच खाल्ले पाहिजेत. रोज जर गाजर खाल्ले तर शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते. ज्यामुळे हृदय निरोगी राहतं.
डोळ्यांसाठी फायदेशीर - गाजर हे डोळ्यांसाठी सुपरफूड मानलं जातं. त्यामुळे कोणतेही गाजर खा. याने डोळ्यांना फायदेच मिळतात. कमी वयात दृष्टी कमजोर होण्याची समस्या यामुळे दूर होण्यास मदत मिळू शकते.
