Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > आता कमी सायीतही निघेल भरपूर साजूक तूप! चमचाभर मिसळा पांढरा पदार्थ - दाणेदार, रवाळ तूप तयार...

आता कमी सायीतही निघेल भरपूर साजूक तूप! चमचाभर मिसळा पांढरा पदार्थ - दाणेदार, रवाळ तूप तयार...

Way to make desi ghee in just 5 minute : फारशी मेहेनत न घेता देखील कमी सायीत अधिकाधिक साजूक तूप कसे काढता येईल याची भन्नाट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2025 13:09 IST2025-10-06T12:54:49+5:302025-10-06T13:09:17+5:30

Way to make desi ghee in just 5 minute : फारशी मेहेनत न घेता देखील कमी सायीत अधिकाधिक साजूक तूप कसे काढता येईल याची भन्नाट ट्रिक...

Way to make desi ghee in just 5 minute The magic of half a teaspoon of baking soda for making ghee | आता कमी सायीतही निघेल भरपूर साजूक तूप! चमचाभर मिसळा पांढरा पदार्थ - दाणेदार, रवाळ तूप तयार...

आता कमी सायीतही निघेल भरपूर साजूक तूप! चमचाभर मिसळा पांढरा पदार्थ - दाणेदार, रवाळ तूप तयार...

वेगवेगळ्या प्रकारच्या भारतीय पदार्थांमध्ये, आवर्जून साजूक तुपाचा वापर केला जातो. आजही कित्येक घरांमध्ये साजूक तूप बाहेरुन विकत न आणता घरच्याघरीच (The magic of half a teaspoon of baking soda for making ghee) तयार केले जाते. घरगुती साजूक तूप हे आरोग्यासाठी खूप चांगले असते. खासकरून घरी तयार केलेल्या तुपाची चव आणि शुद्धताच वेगळी असते. एकदा घरी तयार केलेल्या तुपाची चव घेतली की बाजारातील तूप फार कमी लोकांना आवडते. बाजारात मिळणाऱ्या तुपापेक्षा हे एकदम शुद्ध असते. घरीच शुद्ध, दाणेदार आणि (Way to make desi ghee in just 5 minute) सुगंधी तूप काढायचे असल्यास भरपूर साय जमा करावी लागते.

दूध तापवल्यानंतर वर जमा होणारी साय रोज साठवणे अनेकांना कंटाळवाणे वाटते किंवा कमी दूध असल्यामुळे पुरेशी साय जमा होत नाही. यामुळे अनेकदा गृहिणी घरच्याघरीच साजूक तूप तयार करण्याचा विचार सोडून देतात. पण आता काळजी करू नका! आपण एक साधीसोपी ट्रिक वापरुन, अगदी कमी सायीत देखील भरपूर साजूक तूप सहज काढू शकतो. ही खास युक्ती म्हणजे साय विरजण्याच्या प्रक्रियेत बेकिंग सोड्याचा (Baking Soda) योग्य वापर करणे. बेकिंग सोड्यामुळे तूप तयार करण्याची प्रक्रिया कशी सुलभ होते आणि फारशी मेहेनत न घेता देखील कमी वेळात अधिक तूप कसे काढता येईल ते पाहूयात. 

५ मिनिटांत किलोभर साजूक तूप तयार करण्याची पद्धत...(How to prepare 1 kg of ghee in 5 minutes)

साजूक तूप तयार करण्यासाठी, जमा केलेली साय फ्रिजमधून काढा आणि थोडा वेळ सायीला रुम टेम्परेचरवर येण्यासाठी तसेच ठेवून द्यावे. आता प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घाला, त्यानंतर त्यात साय घाला आणि झाकण लावून गॅसवर ठेवा. कुकरमध्ये दोन शिट्ट्या येईपर्यंत साय शिजवा. कुकरमध्ये पाणी घातल्यामुळे साय भांड्याला चिटकून करपण्याची चिंता राहत नाही. कुकर उघडल्यानंतर आपल्याला साजूक तूप वरच्या बाजूला तरंगताना दिसेल. कुकरमध्ये शिजल्यानंतर साय तूप सोडण्यास सुरुवात करते. या पद्धतीने वेळ आणि मेहनत दोन्हीची बचत होते आणि तुम्हाला घरगुती शुद्ध, दाणेदार तूप सहज मिळते.

गरमागरम पहाडी मसाला चहा! सर्दी, खोकला पचन आणि इम्युनिटीसाठी आहे वरदान - प्या 'असा' फक्कड चहा...  

भेळवाल्यासारखाच बारीक कांदा चिरण्याची जबरदस्त ट्रिक! डोळ्याला पाणी यायच्या आधी झटपट चिरुन होईल कांदा... 

अर्धा टेबलस्पून बेकिंग सोड्याची बघा कमाल... (The magic of half a teaspoon of baking soda)

कुकरमधून तूप वेगळे झाल्यावर, सायीमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा मिसळा. बेकिंग सोडा जादूप्रमाणे काम करेल. यामुळे सायीचे खूप लवकर आणि सहजपणे लोण्यामध्ये रूपांतर करण्यास मदत मिळते. यासोबत तुम्ही अर्धा चमचा हळद पावडर देखील घालू शकता. हळदीमुळे तुपाचा रंग अधिक चांगला येईल. 

तुळशीच्या काड्यांचा चहा मसाला, ‘असा’ फक्कड चहा तुम्ही कधी प्यायलाच नसेल! तुळशीचा खास औषधी उपयोग...

बेकिंग सोडा घातल्यावर नेमकं होत काय ? 

तूप तयार करण्यासाठी सायीमध्ये, बेकिंग सोडा घातल्यानंतर रासायनिक प्रक्रिया जलद होते आणि सायीचे झटपट तुपात रूपांतर होते. मिश्रण आणखी २ ते ३ मिनिटे शिजवा आणि फेस दिसू लागल्यावर गॅस बंद करा. बेकिंग सोडा अल्कलाईन (Alkaline) असतो. तो सायीमध्ये मिसळल्यावर उष्णता वाढवतो. यामुळे सायीमध्ये असलेले फॅट जलद गतीने वेगळे होण्यास मदत मिळते. मिश्रण थंड झाल्यावर तूप एका स्वच्छ भांड्यात साठवून स्टोअर करून ठेवा.

Web Title : कम क्रीम से घी बनाएं: बेकिंग सोडा का आसान तरीका

Web Summary : कम क्रीम से भी घर पर घी बनाएं! मथते समय बेकिंग सोडा का उपयोग करें। क्रीम को प्रेशर कुकर में पकाएं, फिर बेकिंग सोडा मिलाएं। इससे वसा जल्दी अलग हो जाती है, और शुद्ध घी मिलता है।

Web Title : Make ghee from less cream using baking soda: Easy method

Web Summary : Make ghee at home even with less cream! Use baking soda during churning. Cook cream in a pressure cooker, then add baking soda. This separates fat quickly, giving pure ghee.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.