Lokmat Sakhi >Food > डाएट करायचे आहे? पण चमचमीत खायला आवडते? मग हे काबुली चण्याचे कुरकुरीत सॅलेड खा

डाएट करायचे आहे? पण चमचमीत खायला आवडते? मग हे काबुली चण्याचे कुरकुरीत सॅलेड खा

Want to diet? But love to eat delicious food? Then try this crispy chickpea salad : काबुली चण्याची उसळ तर खाताच. पण हा पदार्थ खाऊन बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2025 16:00 IST2025-04-29T15:59:44+5:302025-04-29T16:00:25+5:30

Want to diet? But love to eat delicious food? Then try this crispy chickpea salad : काबुली चण्याची उसळ तर खाताच. पण हा पदार्थ खाऊन बघा.

Want to diet? But love to eat delicious food? Then try this crispy chickpea salad. | डाएट करायचे आहे? पण चमचमीत खायला आवडते? मग हे काबुली चण्याचे कुरकुरीत सॅलेड खा

डाएट करायचे आहे? पण चमचमीत खायला आवडते? मग हे काबुली चण्याचे कुरकुरीत सॅलेड खा

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त संयम ठेवावा लागतो तो जिभेवर. चमचमीत झणझणीत तळलेले पदार्थ खाणे टाळावे लागते.(Want to diet? But love to eat delicious food? Then try this crispy chickpea salad.) मात्र काही रेसिपी आहेत ज्यांच्यामुळे डाएट फार रुचकर होते. अशीच एक रेसिपी आहे जी करून बघायलाच हवी. प्रोटिनने परिपूर्ण असलेले हे सॅलड फार पौष्टिक आहे.  

साहित्य  
काबुली चणे, कांदा, टोमॅटो, गाजर, कोबी, सिमला मिरची, आलं, लसूण, हिरवी मिरची, चीज, छोले मसाला, मीठ, लाल तिखट, जिरे पूड, पनीर, तूप  

कृती  
१. काबुली चणे रात्रभर भिजत ठेवा. (Want to diet? But love to eat delicious food? Then try this crispy chickpea salad.)सकाळी पाणी काढून टाका. कुकरमध्ये काबुली चणे उकडून घ्या. कुकर उघडल्यावर चण्यातील पाणी काढून घ्या. चणे सुके करून घ्या. त्यामध्ये लाल तिखट घाला. तसेच चवीपुरते मीठ घाला. छोले मसाला घाला. आल्याचे तुकडे करा. लसूण सोलून घ्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करा. आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्या. ती पेस्ट चण्यांवर टाका. सगळं एकजीव करून घ्या.  

२. कांदा छान बारीक चिरून घ्या. टोमॅटोही चिरून घ्या. गाजर उकडून घेतले तरी छान लागते. असेच कच्चे घातले तरी चालते. सिमला मिरचीही चिरून घ्या. सगळ्या भाज्या एकतर बारीक चिरून घ्या किंवा मग लांब-लांब पातळ काप करा.  

३. एका पॅनमध्ये चमचाभर तूप घ्या. त्यावर मसाला लावलेले काबुली चणे छान परतून घ्या. जरा कुरकुरीत होऊ द्या. एका खोलगट भांड्यात ते चणे काढा. चमचाभर तूप कढईमध्ये टाका आणि त्यामध्ये पनीरचे लहान तुकडे करून टाका. पनीर छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्या. नंतर चणे ठेवलेल्या भांड्यातच काढून घ्या. त्याच पॅनमध्ये चिरलेल्या सगळ्या भाज्या टाका. त्यावर थोडे पाणी टाका आणि एक वाफ काढून घ्या.  

४. पाच मिनिटांनी भाज्या जरा मऊ झाल्या असतील. मग त्यातील पाणी काढून घ्या. भाज्या काबुली चणे ठेवलेल्या भांड्यात टाका. वरतून चीज किसून घाला. हवे असल्यास ओरेगॅनो घाला. इतरही सिझनिंग्स घालू शकता.

Web Title: Want to diet? But love to eat delicious food? Then try this crispy chickpea salad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.